Viral Video : पापाराझींनी विचारलं युझीभाई कुठं आहे? धनश्रीनं काय उत्तर दिलं? पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral Video : पापाराझींनी विचारलं युझीभाई कुठं आहे? धनश्रीनं काय उत्तर दिलं? पाहा

Viral Video : पापाराझींनी विचारलं युझीभाई कुठं आहे? धनश्रीनं काय उत्तर दिलं? पाहा

Jan 09, 2025 06:32 PM IST

Dhanashree Verma Video : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा हिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती चहलबाबत सांगताना दिसत आहे.

Viral Video : पापाराझींनी विचारलं युझीभाई कुठं आहे? धनश्रीनं काय उत्तर दिलं? पाहा
Viral Video : पापाराझींनी विचारलं युझीभाई कुठं आहे? धनश्रीनं काय उत्तर दिलं? पाहा

Dhanashree Verma About Yuzvendra Chahal : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात सर्व काही ठीक चालले नसल्याचे बोलले जात आहे. दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे.

पण अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका पापाराझीने धनश्रीला विचारले की युजी भाई कुठे आहे? त्यावर धनश्रीने थेट उत्तर दिले.

व्हिडिओमध्ये धनश्री कुठेतरी जात असल्याचे दिसत आहे. या दरम्यान पापाराझींनी तिला विचारले की युजीभाई कुठे आहेत? याला प्रत्युत्तर देताना धनश्री वर्मा एकदम अडखळत बोलताना दिसत आहे. पापाराझींनी धनश्रीला विचारले, "युजीभाई काय करत आहेत?" याला उत्तर देताना धनश्री वर्मा म्हणाली, युजी भाई खेळण्याच्या तयारीत व्यस्त आहे.

हे उत्तर दिल्यानंतर धनश्री तिथून निघून जाते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ कधीचा आहे याची पुष्टी झालेली नाही. हा व्हिडिओ घटस्फोटाच्या बातम्या येण्यापूर्वीचा किंवा नंतरचाही असू शकतो.

चहल आणि धनश्री इंस्टाग्रामवर अ‍ॅक्टिव

घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा इंस्टाग्रामवर चांगलेच सक्रिय दिसत आहेत. दोघेही इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून अशा पोस्ट शेअर करत आहेत, ज्यावरून घटस्फोटाच्या वृत्ताला पुष्टी मिळाल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाच्या वृत्तावर अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

युझी चहल सध्या टीम इंडियाच्या बाहेर

युझवेंद्र चहलने ऑगस्ट २०२३ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. सध्या तो भारतीय संघाबाहेर आहे. तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की चहल जून २०२४ मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा भाग होता, परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या