भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल झाला. गौतम गंभीरची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशातच आता, पाकिस्तान क्रिकेटमध्येही मोठा बदल पाहायला मिळाला आहे. वास्तविक, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निवड समितीमध्ये मोठे बदल केले आणि वहाब रियाझ आणि अब्दुल रझाक यांना बडतर्फ केले आहे.
नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये संघाच्या खराब कामगिरीनंतर बोर्डाने हा निर्णय घेतला.
रझाक नुकताच पुरुष आणि महिला संघाच्या निवड समितीचा भाग बनला होता, तर वहाब रियाझ पुरुष निवड समितीचा भाग होता.
टी-20 विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीनंतर निवडकर्ता म्हणून वहाब रियाजची नोकरी धोक्यात आल्याचे ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालात म्हटले आहे. वाहब आधी संघाचा मुख्य निवडकर्ता होता, पण नंतर त्याला संघाच्या निवड समितीचे सदस्य बनवण्यात आले. माजी वेगवान गोलंदाज अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकासाठी व्यवस्थापक म्हणून पाकिस्तानसोबत प्रवास केला होता.
गेल्या ४ वर्षात पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये एकूण ६ टॉप सिलेक्टर्स झाले आहेत. या ६ निवडकर्त्यांच्या यादीत वहाब रियाझ, मोहम्मद वसीम, शाहिद आफ्रिदी, इंझमाम उल हक, हारून रशीद आणि मिसबाह उल हक यांचा समावेश आहे. या सर्वांचा कार्यकाळ खूपच कमी कालावधीचा होता.
टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये पाकिस्तानची कामगिरी अत्यंत खराब झाली. संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात अमेरिका आणि भारताविरुद्धच्या पराभवाने केली. त्यानंतर संघाने पुढचे दोन सामने जिंकले तरी सुपर-८ मध्ये स्थान मिळवता आले नाही.s
संबंधित बातम्या