kamran akmal : कामरान अकमलचं शीख धर्माविषयी वादग्रस्त विधान, हरभजन भडकल्यानंतर मागितली माफी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  kamran akmal : कामरान अकमलचं शीख धर्माविषयी वादग्रस्त विधान, हरभजन भडकल्यानंतर मागितली माफी

kamran akmal : कामरान अकमलचं शीख धर्माविषयी वादग्रस्त विधान, हरभजन भडकल्यानंतर मागितली माफी

Jun 11, 2024 12:21 PM IST

Kamran Akmal Disrespect Sikh Religion : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमलने शीख धर्मावर आणि अर्शदीप सिंगबाबत वादग्रस्त विधान केले होते. यानंतर हरभजन सिंग चांगलाच संतापला होता, आता अकमलने जाहीर माफी मागितली आहे.

Kamran Akmal : कामरान अकमलचं शीख धर्मावर वादग्रस्त विधान, हरभजन भडकल्यानंतर मागितली माफी
Kamran Akmal : कामरान अकमलचं शीख धर्मावर वादग्रस्त विधान, हरभजन भडकल्यानंतर मागितली माफी

Harbhajan Singh On Kamran Akmal : पाकिस्तानचे अनेक क्रिकेटपटू काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असतात. आता पाकिस्तान संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल एका नव्या वादात अडकला आहे. अकमलने शीख धर्मावर वादग्रस्त विधान केले आहे.

वास्तविक, अकमलने लाइव्ह टीव्हीवर शीख धर्माची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, हे पाहून भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग चांगलाच भडकला आहे.

हरभजन सिंग भडकला

भज्जीने अकमलने केलेल्या असभ्य विधानावर त्याची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. अकमलने भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगबद्दल बोलताना हे वादग्रस्त विधान केले होते. भारत-पाकिस्तान सामन्यात अर्शदीप सिंगने २० वे षटक टाकले होते, याबद्दल बोलताना अकमलने वादग्रस्त टिप्पणी केली होती.

लाइव्ह टीव्हीवर अकमलने अर्शदीप आणि शीख धर्माबद्दल अशा चुकीच्या गोष्टी बोलल्या होत्या, ज्या इथे लिहिणे शक्य नाही. त्याचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

अकमलचा व्हिडीओ शेअर करताना हरभजन सिंगने म्हटले की, अकमल तुला लाज वाटली पाहिजे असे बोलताना. तोंड उघडण्यापूर्वी शिखांचा इतिहास जाणून घे. आम्ही शिखांनी तुमच्या आई बहिणींना घुसखोरांपासून वाचवले तेव्हा १२ वाजले होते.."

कामरान अकमलने शीख समुदायाची माफी मागितली

हरभजन सिंगच्या या संतप्त उत्तरानंतर कामरान अकमलने शीख समुदायाची माफी मागितली आहे. अकमलने X वर लिहिले, “मला माझ्या अलीकडील टिप्पण्यांबद्दल मनापासून खेद वाटतो आणि हरभजन सिंग आणि शीख समुदायाची मनापासून माफी मागतो. माझे शब्द अयोग्य आणि अपमानास्पद होते. मला जगभरातील शीख लोकांबद्दल अत्यंत आदर आहे आणि कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. “मला खरच माफ करा.”

अर्शदीपची धारदार गोलंदाजी

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी ((९ जून) झालेल्या सामन्यात अर्शदीप सिंगने २० वे षटक टाकले. ज्यामध्ये पाकिस्तानला १८ धावांची गरज होती. पण, अर्शदीपने केवळ ११ धावा देत पाकिस्तानचा पराभव केला होता. भारतीय वेगवान गोलंदाजाने शेवटच्या षटकात काही अचूक यॉर्कर टाकले होते, ज्याचे पाकिस्तानी फलंदाजांकडे उत्तर नव्हते. शेवटच्या षटकात त्याने १ बळीही घेतला.

Whats_app_banner