PAK vs ENG : पाकिस्तानने ३ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकली, साजिद-नोमानने इंग्लंडची जिरवली
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PAK vs ENG : पाकिस्तानने ३ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकली, साजिद-नोमानने इंग्लंडची जिरवली

PAK vs ENG : पाकिस्तानने ३ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकली, साजिद-नोमानने इंग्लंडची जिरवली

Updated Oct 26, 2024 12:54 PM IST

PAK vs ENG 3rd Test Highlights : २०२१ नंतर पाकिस्तानने मायदेशात कसोटी मालिका जिंकली आहे. साजिद खान आणि नोमान अली यांनी या सामन्यात संघासाठी दमदार कामगिरी केली.

PAK vs ENG : पाकिस्तानने ३ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकली, साजिद-नोमानने इंग्लंडची जिरवली
PAK vs ENG : पाकिस्तानने ३ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकली, साजिद-नोमानने इंग्लंडची जिरवली (AP)

पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आहे. पाकिस्तानने मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडला हरवून इतिहास रचला. रावळपिंडीच्या रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव केला. 

यासह २०२१ नंतर पाकिस्तानने मायदेशात कसोटी मालिका जिंकली आहे. साजिद खान आणि नोमान अली यांनी या सामन्यात संघासाठी दमदार कामगिरी केली. या सामन्यात साजिदने १० आणि नोमान अलीने ९ विकेट घेतल्या.

पहिल्या डावात साजिद खानने फलंदाजी करताना ६ बळी घेतले आणि ४८ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात साजिदने ४ बळी घेतले. याशिवाय नोमान अलीने पहिल्या डावात ३ बळी घेतले आणि फलंदाजी करताना ४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात नोमानने ६ विकेट घेतल्या.

बाबर आझमशिवाय पाकिस्तान जिंकला

पाकिस्तानने मालिका २-१ ने जिंकली. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पुढच्या दोन कसोटी जिंकून पाकिस्तानने मालिका जिंकली. 

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे बाबर आझम या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळला होता, ज्यामध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यानंतर पुढच्या दोन सामन्यांमध्ये बाबर पाकिस्तान संघात नव्हता आणि संघाने दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातली.

पाकिस्तानने ३ षटकात सामना संपवला

इंग्लंडने पहिल्या डावात २६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात ३४४ धावा केल्या. यानंतर त्याने इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या ११२ धावांत आटोपला. अशा स्थितीत पाकिस्तानला दुसऱ्या डावात केवळ ३६ धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी ३.१ षटकांत १ गडी गमावून पूर्ण केले. म्हणजेच हा सामना जिंकण्यासाठी फक्त १९ चेंडू लागले.

छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तान संघाला १४ धावांवर पहिला धक्का बसला. ८ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर सॅम अयुबला जॅक लीचने एलबीडब्ल्यू केले.

यानंतर अब्दुल्ला शफीक आणि शान मसूद यांनी कोणताही धक्का बसू दिला नाही. शफिक ५ धावांवर नाबाद राहिला तर कर्णधार शान मसूदने ६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार लगावत २३ धावांची नाबाद खेळी खेळली.

या सामन्यात शान मसुदने शोएब बशीरला विजयी षटकार ठोकताच पाकिस्तानी संघातील खेळाडूंनी तुफानी जल्लोष केला. शान मसूदसाठीही ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर त्याला कर्णधारपदावरून हटवा, अशी मागणी होत होती.

अशा प्रसंगी इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकणे खूप खास आहे. विशेष म्हणजे या संघात ना बाबर आझम आहे, ना शाहीन आफ्रिदी ना नसीम शाह. असे असतानाही पाकिस्तानने दमदार कामगिरी केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या