PAK vs SA : आंतरराष्ट्रीय सामन्यात गल्ली क्रिकेटसारखा राडा, शाहीन आफ्रिदी आणि आफ्रिकेचा युवा स्टार भिडले, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PAK vs SA : आंतरराष्ट्रीय सामन्यात गल्ली क्रिकेटसारखा राडा, शाहीन आफ्रिदी आणि आफ्रिकेचा युवा स्टार भिडले, पाहा

PAK vs SA : आंतरराष्ट्रीय सामन्यात गल्ली क्रिकेटसारखा राडा, शाहीन आफ्रिदी आणि आफ्रिकेचा युवा स्टार भिडले, पाहा

Published Feb 12, 2025 08:08 PM IST

SA vs PAK ODI Match : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका सामन्यात एक गंभीर घटना घडली. आजच्या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिीदी आणि आफ्रिकेचा युवा स्टार मॅथ्यू ब्रीट्झके यांच्यात वाद झाला.

PAK vs SA : आंतरराष्ट्रीय सामन्यात गल्ली क्रिकेटसारखा राडा, शाहीन आफ्रिदी आणि आफ्रिकेचा युवा स्टार भिडले, पाहा
PAK vs SA : आंतरराष्ट्रीय सामन्यात गल्ली क्रिकेटसारखा राडा, शाहीन आफ्रिदी आणि आफ्रिकेचा युवा स्टार भिडले, पाहा

Shaheen Afridi vs Matthew Breetzke : पाकिस्तानमध्ये सध्या तिरंगी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत न्यूझीलंडचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. आता आज पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ आमनेसामने आहेत. यातील जो संघ जिंकेल, तो फायनलमध्ये न्यूझीलंडला भिडेल.

दरम्यान, आजच्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका सामन्यात एक गंभीर घटना घडली. आजच्या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिीदी आणि आफ्रिकेचा युवा स्टार मॅथ्यू ब्रीट्झके यांच्यात वाद झाला.

वास्तविक, लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना स्कोअरबोर्डवर ३५२ धावांचा डोंगर उभारला. या मालिकेत आफ्रिकेचा फलंदाज मॅथ्यू ब्रिट्झकेने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध १५० धावा केल्या. आता त्याने पाकिस्तान संघाविरुद्धही ८३ धावांची शानदार खेळी केली.

मात्र आज झालेल्या सामन्यात त्याच्या आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्यातील वादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ही घटना दक्षिण आफ्रिकेच्या डावातील २८ व्या षटकाची आहे, ज्यामध्ये ब्रित्झकेने शाहीनचा बॉल डिफेन्स केला. चेंडू खेळल्यानंतर त्याने बॅट आडवी फिरवली, पण शाहीन आफ्रिदीला वाटले की, त्याने त्याच्या दिशेने बॅट फिरवली. यानंतर आफ्रिदीने ब्रित्झकेच्या दिशेने काही पावले टाकली आणि रागाने काहीतरी उद्गार काढले. यानंतर ब्रित्झकेनेही प्रत्युत्तर दिले. अशा स्थितीत मैदानावरील वातावरण काहीकाळ गरम झाले होते. पण इतर खेळाडू आणि पंचांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले.

या सामन्यात ब्रित्झकेने ८४ चेंडूत ८३ धावा करताना १० चौकार आणि १ षटकार ठोकला. दुसरीकडे, शाहीन आफ्रिदीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने १० षटकात ६६ धावा देत २ बळी घेतले.

दक्षिण आफ्रिकेला नवा स्टार मिळाला

२६ वर्षीय मॅथ्यू ब्रिट्झकेने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केले आहे. त्याने केवळ एक कसोटी डाव खेळला आहे, ज्यात तो शून्य धावांवर बाद झाला होता.

तर त्याने १० टी-20 सामन्यांमध्ये १५१ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत २ सामन्यात २२३ धावा केल्या आहेत. आतापर्यंत १ शतक आणि १ अर्धशतक त्याच्या बॅटमधून आले आहे.

टी-20 मध्ये सातत्यपूर्ण कामगिरीसाठी त्याला आयपीएलचा करारही मिळाला आहे. तो IPL २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळणार आहे. लखनऊ फ्रँचायझीने त्याला ५७ लाख रुपयांमध्ये सामील केले होते.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या