PAK vs NZ : आज पाकिस्तान-न्यूझीलंड फायनल रंगणार, सामना लाईव्ह कोणत्या अ‍ॅपवर दिसणार? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PAK vs NZ : आज पाकिस्तान-न्यूझीलंड फायनल रंगणार, सामना लाईव्ह कोणत्या अ‍ॅपवर दिसणार? जाणून घ्या

PAK vs NZ : आज पाकिस्तान-न्यूझीलंड फायनल रंगणार, सामना लाईव्ह कोणत्या अ‍ॅपवर दिसणार? जाणून घ्या

Published Feb 14, 2025 10:47 AM IST

PAK vs NZ Final Live Streaming : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना आज कराचीत रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी २:३० वाजता खेळला जाणार आहे.

PAK vs NZ : आज पाकिस्तान-न्यूझीलंड फायनल रंगणार, सामना लाईव्ह कोणत्या अ‍ॅपवर दिसणार? जाणून घ्या
PAK vs NZ : आज पाकिस्तान-न्यूझीलंड फायनल रंगणार, सामना लाईव्ह कोणत्या अ‍ॅपवर दिसणार? जाणून घ्या (AP)

How To Watch PAK vs NZ Final In India : पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिरंगी मालिका खेळली जात आहे. या मालिकेचा अंतिम सामना आज (१४ फेब्रुवारी) पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर दुपारी २:३० वाजता दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. 

भारतातील क्रिकेट चाहतेहा सामना लाईव्ह कसा पाहू शकतील, याबाबत आपण येथे जाणून घेणार आहोत. 

पाकिस्तान-न्यूझीलंड फायनल लाईव्ह स्ट्रिमिंग

वास्तविक, भारतातील चाहते फॅनकोडवर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनल पाहू शकतील. यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.

पाकिस्तान-न्यूझीलंडची हेड टू हेड रेकॉर्ड

पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघात आतापर्यंत ११७ वनडे सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानने ६१ वेळा न्यूझीलंडचा पराभव केला आहे. तर किवी संघाने पाकिस्तानचा ५१ वेळा पराभव केला आहे. या आकडेवारीवरून पाकिस्तानचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

याशिवाय ३ सामन्यांत एकही निकाल लागला नाही. पाकिस्तानने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर २२ वेळा पराभूत केले आहे. मात्र, आता आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दोन्ही संघ 

पाकिस्तान संघ: फखर जमान, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर/कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, अबरार अहमद, कामरान गुलाम, फहीम अश्रफ, हरिस रौफ, अकीफ जावेद, उस्मान खान.

न्यूझीलंड संघ: विल यंग, ​​डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, बेन सियर्स, विल्यम ओरोरके, रचिन रवींद्र, मार्क चॅपमन, नॅथन स्मिथ, लॉकी फर्ग्युसन.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या