PAK vs NZ Schedule, Venues, Squad and Streaming : यावर्षी टी-20 वर्ल्डकप खेळलाज जाणार आहे. पण त्याआधी वर्ल्डकपची तयारी करण्यासाठी पाकिस्तानी टीम जबरदस्त सराव करत आहे. त्यांच्या ट्रेनिंगचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, टी-20 वर्ल्डकप २०२४ आधी पाकिस्तानी संघ न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे.
या मालिकेसाठी न्यूझीलंडची टीम पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना १८ एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे. तर दुसरा टी-20 सामना २० एप्रिलला होणार आहे. यानंतर २१ एप्रिलला दोन्ही संघ तिसऱ्या टी-२० साठी आमनेसामने येतील. या मालिकेतील चौथा टी-20 २५ एप्रिल आणि पाचवा २७ एप्रिल रोजी खेळवला जाईल.
पाकिस्तान-न्यूझीलंड टी-20 मालिकेतील पहिले ३ सामने रावळपिंडीत खेळवले जाणार आहेत. तर मालिकेतील चौथा आणि पाचवा टी-20 लाहोरमध्ये खेळवला जाणार आहे.
वास्तविक, बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ टी-20 विश्वचषकापूर्वी 3 देशांसोबत टी-20 मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडनंतर पाकिस्तानचा संघ आयर्लंड आणि इंग्लंडशी भिडणार आहे. यानंतर बाबर आझमची टीम टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला रवाना होईल. मात्र, या मालिकेसाठी दोन्ही संघांनी आपापल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. मोहम्मद आमिरचे तब्बल ४ वर्षांनी पाकिस्तानी संघात पुनरागमन झाले आहे.
बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद रिझवान, मोहम्मद आमिर, इरफान खान, नसीम शाह, सईम अयुब, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, उस्मान खान जमान खान आणि डॉ.
राखीव खेळाडू- हसिबुल्ला खान, मोहम्मद अली, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान आणि सलमान अली आगा
मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), फिन ऍलन, मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, जेकब डफी, डीन फॉक्सक्रॉफ्ट, बेन लिस्टर, कोल मॅककॉन्ची, ॲडम मिल्ने, जिमी नीशम, विल ओ'रुर्के, टिम रॉबिन्सन, बेन सियर्स, टिम सेफर्ट आणि ईश सोधी.
पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिका भारतीय चाहत्यांना फॅनकोड अॅपवर पाहता येणार आहे. वास्तविक, फॅनकोड अॅप भारतात पाकिस्तान आणि न्यूझीलंड T20 मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग करेल. क्रिकेट चाहत्यांना फॅनकोड ॲपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेता येणार आहे. याशिवाय फॅनकोडच्या वेबसाइटवरही लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.