PAK vs ENG : पाकिस्तानी गोलंदाजांनी १४ धावात ४ विकेट काढल्या, मुलतान कसोटी रोमहर्षक स्थितीत
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PAK vs ENG : पाकिस्तानी गोलंदाजांनी १४ धावात ४ विकेट काढल्या, मुलतान कसोटी रोमहर्षक स्थितीत

PAK vs ENG : पाकिस्तानी गोलंदाजांनी १४ धावात ४ विकेट काढल्या, मुलतान कसोटी रोमहर्षक स्थितीत

Published Oct 16, 2024 07:05 PM IST

Pakistan vs England 2nd Test, Day 2 Highlights : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना मुल्तान येथे खेळला जात आहे.

PAK vs ENG : पाकिस्तानी गोलंदाजांनी १४ धावात ४ विकेट काढल्या, मुलतान कसोटी रोमहर्षक स्थितीत
PAK vs ENG : पाकिस्तानी गोलंदाजांनी १४ धावात ४ विकेट काढल्या, मुलतान कसोटी रोमहर्षक स्थितीत

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात मुलतानमध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (१६ ऑक्टोबर) पाकिस्तानचा डाव ३६६ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ६ विकेट गमावत २३९ धावा केल्या होत्या. यष्टिरक्षक जेमी स्मिथ १२ धावांवर तर ब्रेडन कार्स २ धावांवर नाबाद माघारी परतले.

एकवेळ इंग्लंडची धावसंख्या दोन विकेट्सवर २११ धावा होती. पण त्यानंतर पाकिस्तानने दमदार पुनरागमन केले आणि इंग्लंडचा डाव २२५ धावांत ६ विकेट असा केला. इंग्लंड सध्या पाकिस्तानपेक्षा १२७ धावांनी मागे आहे. पाकिस्तानकडून साजिद खानने ४ विकेट घेतल्या. तर नोमान अलीने २ इंग्लिश फलंदाजांना आपले बळी बनवले.

इंग्लंडकडून बेन डकेटने शतक झळकावले

दुसऱ्या दिवशी पाकिस्तानला ३६६ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडने बॅझबॉल स्टाईलमध्ये आपल्या डावाला सुरुवात केली. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. 

क्रॉली ३६ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने २७ धावा करून बाद झाला. यानंतर ओली पोपने ३७ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने २९ धावा केल्या. सेट होऊन दोघेही बाद झाले.

पण यानंतर बेन डकेटने आपल्या आक्रमक शैलीत खेळ सुरूच ठेवला. त्याने केवळ १२९ चेंडूत ११४ धावांची खेळी खेळली. या डावात त्याच्या बॅटमधून १६ चौकार आले.

शेवटच्या काही षटकात पाकिस्तानने डाव पालटला

एकेकाळी हा सामना इंग्लंडच्या हातात आहे आणि पाकिस्तानचा संघ खूप मागे पडला आहे, असे वाटत होते. धावसंख्या २११ होती आणि बेन डकेट आणि जो रूट क्रीजवर होते. मात्र दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात काही षटकांचा खेळ बाकी असताना पाकिस्तानी गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आणि सामन्यात पुनरागमन केले.

इंग्लंडने  शेवटच्या १८ चेंडूत १४ धावा केल्या. पण ४ मोठे विकेटही गमावले. साजिद खानचा पहिला बळी जो रूट ठरला. त्यानंतर त्याने आपल्या पुढच्याच षटकात बेन डकेट आणि हॅरी ब्रूक यांना बाद केले. यानंतर नोमान अलीने कर्णधार बेन स्टोक्सलाही बाद केले.

जो रूट ५४ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. तर पहिल्या कसोटीत त्रिशतक झळकावणारा हॅरी ब्रूक ९ धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार बेन स्टोक्स केवळ १ धाव काढून बाद झाला. आता हा सामना बरोबरीत आहे. तिसरा दिवस खूप रोमांचक असणार आहे.

पाकिस्तानचा पहिला डाव

पाकिस्तानने आज दुसऱ्या दिवसाची (१६ ऑक्टोबर) सुरुवात ५ गड्यांच्या मोबदल्यात २५९ धावांवरून केली. पाकिस्तानने आपल्या धावसंख्येत १०७ धावांची भर घातली आणि २६६ धावा करून सर्व बाद झाले. पाकिस्तानकडून कामरान गुलामने सर्वाधिक ११८ धावा केल्या.

सॅम अयुबने ७७ धावा केल्या. मधल्या फळीत मोहम्मद रिझवानने ४१ आणि आमिर जमालने ३७ धावा केल्या. आघा सलमाननेही ३१ धावांची चांगली खेळी केली. इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक ४ बळी घेतले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या