मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PAK vs CAN Highlights : पाकिस्तानच्या सुपर ८ च्या आशा जिवंत, कॅनडाचा ७ विकेट्सनी धुव्वा, रिझवानचे झुंजार अर्धशतक

PAK vs CAN Highlights : पाकिस्तानच्या सुपर ८ च्या आशा जिवंत, कॅनडाचा ७ विकेट्सनी धुव्वा, रिझवानचे झुंजार अर्धशतक

Jun 11, 2024 11:18 PM IST

Pakistan vs Canada T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये पाकिस्तानने पहिला विजय मिळवला. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर पाकिस्तानने कॅनडाचा ७ विकेट्सनी पराभव केला.

Pakistan vs Canada T20 World Cup 2024 match
Pakistan vs Canada T20 World Cup 2024 match (PTI)

pakistan vs canada t20 world cup 2024 : PAK Vs CAN T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक २०२४ चा २२ वा सामना पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यात खेळला गेला. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने ७ विकेट्सनी विजय मिळवला.

ट्रेंडिंग न्यूज

तत्पूर्वी, या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर कॅनडाने निर्धारित २० षटकात ७ बाद १०६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्ताने १७.३ षटकात ३ बाद  १०७ धावा करत सामना जिंकला.

विशेष म्हणजे, सुपर-८ च्या आशा जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे पाकिस्तानसाठी खूप महत्वाचे होते. पाकिस्तानने हा सामना १५ चेंडू शिल्लक असताना जिंकला, त्यामुळे त्यांचा निव्वळ रन-रेट यूएसएच्या जवळ आला आहे.

कॅनडासाठी ऍरॉन जॉन्सनने सर्वाधिक धावा केल्या. जॉन्सनने ४४ चेंडूत ५२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि कॅनडाला १०० धावांचा टप्पा पार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानी संघ मैदानात उतरला तेव्हा सॅम अयुब लवकर बाद झाला, मात्र कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या ६३ धावांच्या भागीदारीने पाकिस्तानी संघाचा विजय निश्चित केला.

बाबरने या सामन्यात आज प्लेइंग इलेव्हनमध्ये इफ्तिखार अहमदच्या जागी सॅम अय्युबला संधी दिली, तो केवळ ६ धावा करून बाद झाला. दुसऱ्या डावात या खेळपट्टीवर धावा काढणे खूप अवघड वाटत होते, त्यामुळे संघाला पहिल्या ६ षटकात केवळ २८ धावाच करता आल्या. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी जबाबदारी स्वीकारली आणि १० षटकांत संघाची धावसंख्या ५९ धावांपर्यंत नेली. बाबर आणि रिझवानची भागीदारी कॅनडाला विजयापासून दूर नेत होती.

बाबर क्रीजवर उभा होता, पण १५व्या षटकात थर्ड मॅनच्या दिशेने शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने ३३ धावा केल्या. परिस्थिती अशी होती की पाकिस्तानला शेवटच्या ५ षटकात विजयासाठी २२ धावा करायच्या होत्या. १६व्या षटकात ११ धावा आल्या, त्यामुळे पाकिस्तानचा विजय ही केवळ औपचारिकता राहिली. दरम्यान, दडपणाखाली मोहम्मद रिझवानने ५२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. संघाला विजयासाठी ३ धावांची गरज असताना फखर जमान ४ धावांवर बाद झाला. शेवटी उस्मान खानने दुहेरी धाव काढताना पाकिस्तानसाठी विजयी शॉट मारला.

पाकिस्तानने सुपर ८ च्या आशा जिवंत 

याआधी पाकिस्तानला अमेरिका आणि भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. २०२४ च्या टी-20 विश्वचषकाच्या सुपर-८ मध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील, तर कॅनडावर कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक होते. आता पाकिस्तानला पुढच्या सामन्यातही विजय मिळवावा लागेल. तसेच, अमेरिकेच्या दोन पराभवांची प्रार्थना करावी लागेल.

कॅनडाचा डाव

कॅनडाकडून ॲरॉन जॉन्सनने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ४४ चेंडूत ५२ धावा केल्या, त्यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ४ षटकारही मारले. संघाने सातत्याने विकेट्स गमावल्या, त्यामुळे ९ पैकी ६ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. पाकिस्तानकडून तगडी गोलंदाजी झाली. सर्वच गोलंदाजाचा इकॉनॉमी रेट ७ च्या खाली होता. पाकिस्तान संघाकडून मोहम्मद आमिर आणि हॅरिस रौफ यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या, या दोघांनी २-२ विकेट घेतल्या.

कॅनडासाठी पहिली २ षटके खूपच चांगली होती, मात्र तिसऱ्या षटकात नवनीत धालीवाल ४ धावा काढून बाद झाला. यानंतर कॅनडा सावरू शकला नाही. कारण त्यांचे नियमित अंतराने विकेट पडत गेले. 

१५ षटकांत कॅनडाने ६ गडी गमावून ७७ धावा केल्या होत्या. यानंतर कर्णधार साद बिन जफरने डावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तो २१ चेंडूत १० धावा करून बाद झाला.

डिलन हेलिगर आणि कलीम सना यांनी अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजी केली, पण ते संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊ शकले नाहीत. शेवटच्या षटकांमध्ये कलीम सनाने १३ धावा आणि डिलन हेलिगरने ९ धावा करत कॅनडाचा डाव कसा तरी १०६ धावांपर्यंत नेला.

टी-२० वर्ल्डकप २०२४