PAK vs BAN Test : द्विशतक हुकलं पण मुशफिकर रहीमने पाकिस्तानला रडवलं, रावळपिंडीत कसोटीत बांगलादेश मजबूत स्थितीत-pakistan vs bangladesh 1st test pak vs ban 1st test mushfiqur rahim out 191 runs bangladesh rawalpindi pakistan ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PAK vs BAN Test : द्विशतक हुकलं पण मुशफिकर रहीमने पाकिस्तानला रडवलं, रावळपिंडीत कसोटीत बांगलादेश मजबूत स्थितीत

PAK vs BAN Test : द्विशतक हुकलं पण मुशफिकर रहीमने पाकिस्तानला रडवलं, रावळपिंडीत कसोटीत बांगलादेश मजबूत स्थितीत

Aug 24, 2024 05:33 PM IST

बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी पहिल्या डावात ११७ धावांची आघाडी घेतली आहे. बांगलादेशकडून मुशफिकर रहीम १९१ धावा करून बाद झाला.

PAK vs BAN Test : द्विशतक हुकलं पण मुशफिकर रहीमने पाकिस्तानला रडवलं, रावळपिंडीत कसोटीत बांगलादेश मजबूत स्थितीत
PAK vs BAN Test : द्विशतक हुकलं पण मुशफिकर रहीमने पाकिस्तानला रडवलं, रावळपिंडीत कसोटीत बांगलादेश मजबूत स्थितीत (AFP)

पाकिस्तान-बांगलादेश कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीत खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने दमदार कामगिरी करत पहिल्या डावात ५६५ धावा केल्या आहेत. बांगलादेशने पहिल्या डावात ११७ धावांची आघाडी घेतली आहे. आज (२४ ऑगस्ट) सामन्याचा चौथा दिवस आहे.

बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने चमकदार कामगिरी केली. त्याने १९१ धावांची खेळी खेळली. त्याचे दुहेरी शतक हुकले असले तरी त्याने पाकिस्तानी दिग्गज गोलंदाजांना चांगलेच रडवले आहे.

रहिमआधी सलामीवीर शादमान इस्लामने ९३ धावांची शानदार खेळी केली. मोमिनुल हक आणि लिटन दास यांनीही अर्धशतके झळकावली.

पाकिस्तानने त्यांचा पहिला डाव ६ गडी गमावून ४४८ धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद ५६५ धावा केल्या.

मुशफिकुर रहीमने संघासाठी दमदार कामगिरी करत १९१ धावा केल्या. रहीमने ३४१ चेंडूंचा सामना करताना २२ चौकार आणि १ षटकार मारला. त्याने बांगलादेशला ५०० धावांच्या पुढे नेले. लिटन दास आणि मेहदी हसन मिर्झा यांच्यासोबत मुशफिकुरने चांगली भागीदारी केली.

बांगलादेशच्या डावात, सामन्याच्या चौथ्या दिवशी, मोहम्मद अलीने पाकिस्तानसाठी १५७ वे षटक टाकले. त्याच्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मुशफिकुरने शॉट खेळला. पण चेंडू त्याच्या बॅटला लागून यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानच्या हातात गेला आणि तो बाद झाला.

बांगलादेशकडून लिटन दासने ७८ चेंडूंचा सामना करत ५६ धावा केल्या. त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला. मोमिनुलने ५० धावांची खेळी खेळली. इस्लामने १८३ चेंडूंचा सामना करताना ९३ धावा केल्या. मेहदी हसनने १७९ चेंडूत ७७ धावा केल्या. त्याने ६ चौकार मारले.

पाकिस्तानकडून शकील आणि रिझवानने शतके झळकावली

पाकिस्तानकडून पहिल्या डावात मोहम्मद रिझवानने १७१ धावांची शतकी खेळी तर सौद शकीलने १४१ धावांची शतकी खेळी खेळली. तर सॅम अयुबने शानदार ५६ धावा केल्या. मात्र, अब्दुल्ला शफीक ०२ , शान मसूद ०६ आणि बाबर आझम शून्यावर बाद झाले. शाहीन आफ्रिदीने २९ धावांची आणि आगा सलमानने १९ धावांची खेळी खेळली. या फलंदाजांच्या बळावर पाकिस्तानने ४४८ धावांवर पहिला डाव घोषित केला होता.