Cricket Viral News: पाकिस्तानच्या संघात उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज आहेत. मात्र, अजूनही त्यांच्या फिल्डिंगमध्ये सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत नाहीये. पाकिस्तानच्या खेळाडूंचे फिल्डिंग करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण पाहिले आहेत. नुकतीच पार पडलेल्या आशिया चषक २०२३ पाकिस्तानच्या खराब फिल्डिंगचे दर्शन घडले. यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानच्या खराब फिल्डिंगचे व्हिडिओ शेअर केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात चौकार वाचवण्याच्या नादात पाकिस्तानच्या खेळाडूने ५ धावा गमावल्या. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरणार नाही.
व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर चेंडूवर ऑस्ट्रलियाचा मार्क वॉनने उत्कृष्ट असा फटका मारला. हा चेंडू वेगाने सीमीरेषेच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. तर, चौकार वाचवण्यासाठी शोएब मलिक या चेंडूच्या मागे धावत आहे. चेंडू सीमारेषेला धडकेल तोच, शोएब मलिक उडी मारून चौकार वाचवतो. मात्र, तोपर्यंत ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पाच धावा काढतात. म्हणजेच चौकार अडवून पाकिस्तानचा फायदा नाही तर एका धावेचे नुकसान झाला. हा प्रकार पाहून पाकिस्तानचे खेळाडू सुद्धा आपल्या फिल्डिंगवर हसत होते.
नुकत्याच झालेल्या आशिया चषक २०२३ स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंनी अतिशय खराब फिल्डिंग केली. श्रीलंकेला अखेरच्या दोन चेंडूवर ६ धावांची आवश्यकता असताना पाकिस्तानचे खेळाडू एक धाव रोखण्यासाठी पुढे आले आणि चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागून स्लिपच्या दिशेने चौकारसाठी गेला. यानंतर अखेरच्या चेंडूवर दोन धावा रोखायच्या होत्या, तेव्हा सर्व खेळाडू सीमारेषेवर गेले. हा सामना पाकिस्तानने दोन विकेट्सने गमावला. या पराभवासह पाकिस्तानच्या संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.