खेळतो कमी, बोलतो जास्त! युनूस खान बाबर आझमवर भडकला, विराटबाबतही केलं मोठं वक्तव्य-pakistan team captain younis khan criticizes babar azam gives advice to learn from virat kohli ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  खेळतो कमी, बोलतो जास्त! युनूस खान बाबर आझमवर भडकला, विराटबाबतही केलं मोठं वक्तव्य

खेळतो कमी, बोलतो जास्त! युनूस खान बाबर आझमवर भडकला, विराटबाबतही केलं मोठं वक्तव्य

Sep 16, 2024 03:24 PM IST

Babar Azam Virat Kohli : पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार युनूस खानने टीम ए खेळाडू आणि बाबर आझम यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. युनूसने बाबरला विराट कोहलीकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे.

Babar Azam Virat Kohli :  खेळतो कमी, बोलतो जास्त, युनूस खान बाबर आझमवर भडकला, विराटबाबतही केलं मोठं वक्तव्य
Babar Azam Virat Kohli : खेळतो कमी, बोलतो जास्त, युनूस खान बाबर आझमवर भडकला, विराटबाबतही केलं मोठं वक्तव्य (ICC)

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार युनूस खान याने स्टार फलंदाज बाबर आझम याच्यावर जोरदार टीका केली आहे. अलीकडेच बांगलादेश सारख्या दुबळ्या संघाने पाकिस्तानचा कसोटी मालिकेत २-० असा धुव्वा उडवला. या कसोटी मालिकेत पाकिस्तान संघाची कामगिरी खराब होती.

आता पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार युनूस खानने स्टार खेळाडू बाबर आझम याच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. युनूसने बाबरला विराट कोहलीकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे.

बाबर आझमचा सध्याचा फॉर्म खराब आहे. गेल्या १६ कसोटी डावांमध्ये त्याला अद्याप एकही अर्धशतक करता आलेले नाही. यावर युनूसने बाबर आझमवर राग काढला आणि सांगितले की बाबर आणि इतर अव्वल खेळाडूंनी मैदानावर चांगली कामगिरी केली तर निकाल सर्वांना स्पष्ट होतील.

युनूस खानने कराची प्रीमियर लीगच्या पत्रकार परिषदेत बाबर आझमवर टीका केली. यावेळी युनूस म्हणाला की, बाबरला संघाचे कर्णधारपद देण्यात आले, त्यावेळी तो आमचा सर्वोत्तम फलंदाज होता. जेव्हा त्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा मी देखील तिथे उपस्थित होतो, परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे, त्यामुळे त्याने स्वत: या प्रकरणाचा विचार केला पाहिजे.

यूनुस पुढे म्हणाला की, बाबरने अगदी लहान वयात खूप काही मिळवले आहे, पण आता त्याला भविष्यात काय साध्य करायचे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला देशासाठी पुन्हा पुन्हा खेळण्याची संधी मिळणार नाही हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवावे.

युनूसने बाबरला विराट कोहलीकडून शिकण्याचा सल्ला दिला

युनूस म्हणाला की विराट कोहलीला बघा, त्याने स्वतःच कर्णधारपद सोडले आणि आता तुम्ही त्याची फलंदाजी पहा जी पूर्णपणे वेगळ्या पातळीवर पाहायला मिळते आणि तो सतत नवनवीन विक्रम करत आहे. यावरून हे लक्षात येते की खेळाडूचे पहिले प्राधान्य नेहमीच देशासाठी खेळणे, कर्णधारपदाला नाही'.

Whats_app_banner