मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Pakistan Cricket Team : बाबर आझम कर्णधार, पाकिस्तानी संघाची घोषणा, या १८ खेळाडूंना मिळाले स्थान

Pakistan Cricket Team : बाबर आझम कर्णधार, पाकिस्तानी संघाची घोषणा, या १८ खेळाडूंना मिळाले स्थान

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 02, 2024 02:44 PM IST

pakistan team for england tour : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. पण टी-20 विश्वचषकसाठी संघाची घोषणा नंतर केली जाईल.

pakistan team for england tour : बाबर आझम कर्णधार, पाकिस्तानी संघाची घोषणा, या १८ खेळाडूंना मिळाले स्थान
pakistan team for england tour : बाबर आझम कर्णधार, पाकिस्तानी संघाची घोषणा, या १८ खेळाडूंना मिळाले स्थान (AFP)

Pakistan Cricket Team : आगामी टी-20 वर्ल्डकप १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघही जाहीर झाला आहे. बीसीसीआयने एकूण १५ खेळाडूंची निवड केली आहे. एवढेच नाही तर ४ खेळाडू राखीव म्हणून संघासोबत जाणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

यानंतर आता पाकिस्ताननेही आपल्या संघाची घोषणा केली आहे. पण हा संघ वर्ल्डकपसाठी नसून आयर्लंड आणि इंग्लंड मालिकेसाठी आहे. संघात १८ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ नंतर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात PCB ने गुरुवारी इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघाचा कर्णधार बाबर आझम राहणार आहे. त्याच्याशिवाय अबरार अहमद, आझम खान, हारिस रौफ, सलमान अली आगा, मोहम्मद इरफान खान, उस्मान खान, शाहीन आफ्रिदी यांचा समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तान संघ १० मे ते १४ मे दरम्यान आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे.

यानंतर, संघ २२ मे पासून इंग्लंड दौऱ्यावर जाईल, जिथे ४ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. या मालिकेतून हे संघ टी-२० विश्वचषक २०२४ ची तयारी करतील.

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तानचा संघ: बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, इरफान खान नियाज, नसीम शाह, सैम अय्युब, सलमान अली आगा, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, उस्मान खान.

IPL_Entry_Point