मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PSL 2024 Live Streaming : आजपासून रंगणार पाकिस्तान सुपर लीग, PSL चे सामने कोणत्या अ‍ॅपवर दिसणार? जाणून घ्या

PSL 2024 Live Streaming : आजपासून रंगणार पाकिस्तान सुपर लीग, PSL चे सामने कोणत्या अ‍ॅपवर दिसणार? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 17, 2024 11:58 AM IST

PSL 2024 Live Streaming : पाकिस्तान सुपर लीग 2024 आजपासून (17 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना लाहोर कलंदर आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यात होणार आहे.

PSL 2024 Live Streaming
PSL 2024 Live Streaming (AP)

Pakistan Super League 2024 : पाकिस्तान सुपर लीग २०२४ चा थरार आजपासून रंगणार आहे. या स्पर्धेत ६ संघ एकमेकांना भिडणार आहेत. पाकिस्तान सुपर लीगचे आतापर्यंत ८ सीझन झाले आहेत. लाहोर कलंदर आणि मुलतान सुलतान यांनी प्रत्येकी दोनदा पीएसएलचे विजेतेपद पटकावले आहे. पाकिस्तान सुपर लीग २०२४ चा (PSL 2024) पहिला सामना इस्लामाबाद युनायटेड आणि लाहोर कलंदर यांच्यात होणार आहे.

PSL 2024 मध्ये ३४ सामने खेळले जाणार

पाकिस्तान सुपर लीग २०२४ मध्ये ६ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये लाहोर कलंदर, इस्लामाबाद युनायटेड, मुलतान सुलतान, पेशावर जाल्मी, क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि कराची किंग्ज या संघांचा समावेश आहे. 

यावेळी ६ संघांमध्ये एकूण ३४ सामने होणार आहेत. हे सामने लाहोर, रावळपिंडी, कराची आणि मुलतानच्या मैदानावर खेळले जातील. PSL चा अंतिम सामना १८ मार्च रोजी कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर होणार आहे.

क्वेटा ग्लॅडिएटर्सचा कर्णधार बदलला

पीएसएल २०२४ च्या आधी क्वेटा ग्लॅडिएटर्सने संघात मोठा बदल केला आहे. क्वेटा ग्लॅडिएटर्सने सरफराज अहमदच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रिले रौसोला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या संघात श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा आणि वेस्ट इंडिजचा फिरकीपटू अकिल हुसेन हे खेळाडू सामील झाले आहेत.

PSL चे सामने कोणत्या चॅनेल-अ‍ॅवर दिसणार?

पाकिस्तान सुपर लीग २०२४ चे सामने भारतात फॅनकोड (FanCode) ॲप आणि वेबसाइटवर ऑनलाइन लाईव्ह पाहू शकतात.

PSL चे सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार?

IST रात्री 8:00 वाजता सुरू होतील (डबल-हेडर गेम IST दुपारी 2:30 वाजता सुरू होतील).

PSL चे सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होतील. तसेच, ज्या दिवशी दोन सामने खेळले जातील त्या दिवशीचा पहिला सामना दुपारी २:३० वाजता सुरू होईल.

पाकिस्तान सुपर लीगमध्ये किती संघ खेळणार?

पाकिस्तान सुपर लीग २०२४ मध्ये ६ संघ सहभागी होणार आहेत.

पाकिस्तान सुपर लीगमध्ये किती सामने होणार आहेत?

पाकिस्तान सुपर लीग २०२४ मध्ये ३४ सामने खेळले जाणार आहेत.

IPL_Entry_Point