pakistan team for t20 world cup 2024 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) T20 विश्वचषक २०२४ साठी आपला संघ जाहीर केला आहे. बाबर आझम संघाचा कर्णधार असेल. पीसीबीने मोहम्मद रिझवान आणि हॅरिस रौफ यांच्या फिटनेसबाबत चिंता व्यक्त केली होती, पण आनंदाची बातमी अशी आहे की दोन्ही खेळाडू तंदुरुस्त आहेत आणि विश्वचषकात खेळताना दिसणार आहेत.
फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू मोहम्मद नवाजचे नाव पाकिस्तानी संघातून वगळण्यात आले आहे.
टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ: बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सॅम अयुब, शादाब खान. , शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.
वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि निवृत्तीनंतर परतलेला अष्टपैलू इमाद वसीम यांनाही या संघात स्थान मिळाले आहे. मोहम्मद अमीरने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताला दणका दिला होता, भारताला पराभूत करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
६ जून – पाकिस्तान विरुद्ध यूएसए, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, डॅलस
९ जून – पाकिस्तान विरुद्ध भारत, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क
११ जून – पाकिस्तान विरुद्ध कॅनडा, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क
१६ जून – पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड, सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क आणि ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा