Babar Azam : बाबर आझम त्याच्या आवडत्या संघाविरुद्ध धावा करू शकणार नाही, झिम्बाब्वे दौऱ्यातूनही वगळलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Babar Azam : बाबर आझम त्याच्या आवडत्या संघाविरुद्ध धावा करू शकणार नाही, झिम्बाब्वे दौऱ्यातूनही वगळलं

Babar Azam : बाबर आझम त्याच्या आवडत्या संघाविरुद्ध धावा करू शकणार नाही, झिम्बाब्वे दौऱ्यातूनही वगळलं

Published Oct 27, 2024 04:46 PM IST

Pakistan Squad For Zimbabwe Tour : बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांना झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. याशिवाय टी-20 मालिकेसाठी मोहम्मद रिझवानला विश्रांती देण्यात आली आहे.

Babar Azam : बाबर आझम त्याच्या आवडत्या संघाविरुद्ध धावा करू शकणार नाही, झिम्बाब्वे दौऱ्यातूनही वगळलं
Babar Azam : बाबर आझम त्याच्या आवडत्या संघाविरुद्ध धावा करू शकणार नाही, झिम्बाब्वे दौऱ्यातूनही वगळलं (AP)

पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर दोन्ही संघ ३ टी-20 सामन्यांच्या मालिकेत आमनेसामने येतील. पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील वनडे मालिका २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

त्याचवेळी पाकिस्तानने झिम्बाब्वे मालिकेसाठी आपला संघही जाहीर केला आहे. बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांना वनडे आणि टी-20 मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. याशिवाय टी-20 मालिकेसाठी मोहम्मद रिझवानला विश्रांती देण्यात आली आहे.

बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीला विश्रांती

त्याचबरोबर पाकिस्तानच्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. अलीकडेच बाबर आझमने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. मोहम्मद रिझवान आणि सलमान अली आगा हे नवे कर्णधार होऊ शकतात, असे मानले जात आहे.

याची अधिकृत घोषणा २७  ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. अहमद दुनियाल, हारिस रौफ, हसिबुल्ला, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, तय्यब ताहिर आणि सलमान अली आगा यांना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी दोन्ही संघात स्थान मिळाले आहे, परंतु संघात काही आश्चर्यकारक बदलही झाले आहेत.

पाकिस्तानच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक 

पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना २४ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तर दुसरा वनडे २६ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. यानंतर २८ नोव्हेंबरला दोन्ही संघ तिसऱ्या वनडेसाठी आमनेसामने येतील. वनडे मालिकेनंतर १ डिसेंबरपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे.

या मालिकेतील दुसरा टी-२० सामना ३ डिसेंबरला होणार आहे. त्याचबरोबर उभय संघांमधील तिसरा वनडे सामना ५ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ-

आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, अहमद दानियाल, फैसल अक्रम, हारिस रौफ, हसिबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (वि.), मोहम्मद इरफान खान, सैम अयुब, सलमान अली आगा, शाहनवाज दहनी आणि तय्यब. ताहिर.

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ-

अहमद दानियाल, अराफत मिन्हास, हारिस रौफ, हसिबुल्लाह (विकेटकीपर.), जहांदाद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसूफ, कासिम अक्रम, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, सुफयान मोकीम, तय्यब ताहिर आणि उस्मान खान .

Whats_app_banner

संबंधित बातम्या