T20 World Cup 2024 : बाबर-सॅम अयुब ओपनर तर आमिर-शाहीन वेगवान गोलंदाज, टी-20 वर्ल्डकपसाठी असा असेल पाकिस्तानी संघ-pakistan possible playing xi for t20 world cup 2024 captain babar azam mohammad amir shaheen afridi imad wasim ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup 2024 : बाबर-सॅम अयुब ओपनर तर आमिर-शाहीन वेगवान गोलंदाज, टी-20 वर्ल्डकपसाठी असा असेल पाकिस्तानी संघ

T20 World Cup 2024 : बाबर-सॅम अयुब ओपनर तर आमिर-शाहीन वेगवान गोलंदाज, टी-20 वर्ल्डकपसाठी असा असेल पाकिस्तानी संघ

Apr 21, 2024 06:04 PM IST

Pakistan Squad for T20 World Cup 2024 : आगामी टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ पूर्ण तयारीला लागला आहे. बाबर आझमपासून ते मोहम्मद आमिरसह अनेक प्रसिद्ध खेळाडूंचा टी-20 संघात समावेश केला जाऊ शकतो.

Pakistan Squad for T20 World Cup 2024
Pakistan Squad for T20 World Cup 2024 (AP)

Pakistan team for T20 World Cup 2024 : आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी (T20 World cup 2024)  पाकिस्तानी क्रिकेट संघच खूप व्यस्त असणार आहे. तसेच, यावेळी वर्ल्डकप ट्रॉफी उचलण्यासाठी पाकिस्तानी टीम पूर्ण तयारी करत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) यापूर्वीच बाबर आझमला पुन्हा कर्णधार बनवले आहे. 

तर पाकिस्तानी टीम सध्या न्यूझीलंडविरुद्ध ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहे. यानंतर पाकिस्तानी संघ १० मेपासून आयर्लंडविरुद्ध ३ टी-20 सामन्यांची मालिका आणि २२ मेपासून इंग्लंडविरुद्ध ४ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

या मालिकांमधून पाकिस्तानी संघाचा जबरदस्त सराव आणि तयारी होईल. तसेच,  खेळाडूंनाही चांगली लय मिळेल. या दरम्यान, आगामी टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन आणि स्क्वाड कसा असू शकते हे जाणून घेऊया.

टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन

पुन्हा कर्णधारपद मिळाल्यानंतर बाबर आझम टी-20 विश्वचषकात पाकिस्तानी संघासाठी सलामीला खेळू शकतो. तर बाबरसोबत युवा फलंदाज सॅम अय्युब सलामीला खेळेल. मोहम्मद रिझवान आणि उस्मान खान अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. 

पाकिस्तानकडे अष्टपैलू खेळाडूंची कमतरता नाही. इफ्तिखार अहमद, इमाद वसीम आणि शादाब खान यांचे संघात स्थान जवळपास निश्चित दिसत आहे.

तर मोहम्मद आमिर ४ वर्षांनंतर नुकताच निवृत्तीतून परतला आहे. त्याच्याशिवाय नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहेत. तर उसामा मीर मुख्य फिरकी गोलंदाजी सांभाळू शकतो.

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: बाबर आझम (कर्णधार), सॅम अयुब, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद आमिर, उसामा मीर.

विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संभाव्य संघ : बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद रिझवान, मोहम्मद आमिर, इरफान खान, नसीम शाह, सॅम अयुब, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, उस्मान खान, जमान खान