Lahore Gaddafi Stadium Inauguration : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धात १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानात रंगणार आहे. पण या स्पर्धेच्या काही दिवसआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक गुड न्यूज दिली आहे. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमचे काम पूर्ण झाल्याची घोषणा PCB ने केली आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन रझा नक्वी यांनी ही घोषणा केली आहे.
एक प्रसिद्धीपत्रक जारी करून पीसीबीचे अध्यक्ष म्हणाले, की ज्यांनी रात्रंदिवस मेहनत करून मैदानाच्या नूतनीकरणात योगदान दिले त्या सर्वांचे मी आभार मानतो.
चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीला सुरू होणार आहे, तर स्पर्धा ९ मार्चला संपणार आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने लाहोर, रावळपिंडी आणि कराची येथे खेळवले जातील.
आता पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध मीडिया संस्थेने खुलासा केला आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आज नवीन गद्दाफी स्टेडियमचे उद्घाटन करणार आहेत. या संदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन रझा नक्वी हे स्टेडियमच्या उद्घाटन सोहळ्याच्या व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत.
मंडळाच्या अध्यक्षांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. या उद्घाटन सोहळ्यात अली जफर, आयमा बेग आणि आरिफ लोहार यांसारखे प्रसिद्ध सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. या स्टेडियमचे काम विक्रमी १७० दिवसांत पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला सामना २२ फेब्रुवारीला लाहोरमध्ये खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर अफगाणिस्तानचा सामना २६ फेब्रुवारीला इंग्लंडशी तर २८ फेब्रुवारीला अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे. याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामनाही लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ११ फेब्रुवारीपर्यंत सर्व ३ मैदाने आयसीसीकडे सोपवावी लागतील. भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जातील कारण बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता.
संबंधित बातम्या