Aus vs Pak : दोन सामने गमावताच पाकिस्तानने कर्णधार बदलला, ‘या’ युवा फलंदाजाची लागली लॉटरी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Aus vs Pak : दोन सामने गमावताच पाकिस्तानने कर्णधार बदलला, ‘या’ युवा फलंदाजाची लागली लॉटरी

Aus vs Pak : दोन सामने गमावताच पाकिस्तानने कर्णधार बदलला, ‘या’ युवा फलंदाजाची लागली लॉटरी

Nov 18, 2024 01:49 PM IST

Aus vs Pak, Pakistan New Captain: पाकिस्तानने मोहम्मद रिझवानला कर्णधारपदावरून हटवून आगा सलमानकडे जबाबदारी सोपवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Aus vs Pak : दोन सामने गमावताच पाकिस्तानने कर्णधार बदलला, ‘या’ युवा फलंदाजाची लागली लॉटरी
Aus vs Pak : दोन सामने गमावताच पाकिस्तानने कर्णधार बदलला, ‘या’ युवा फलंदाजाची लागली लॉटरी

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील तिसरा सामना आज सोमवारी होबार्टमध्ये खेळला जात आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानने मोहम्मद रिझवान याला कर्णधारपदावरून हटवले आहे. त्याच्या जागी आगा सलमानला जबाबदारी देण्यात आली आहे.

या सामन्यापूर्वी पाकिस्तानने हा निर्णय घेतला. रिझवानलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर संघाने तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधार बदलला आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, रिझवानला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी आगा सलमान याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आगा सलमानला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव कमी आहे. रिझवान हा अनुभवी खेळाडू आहे. मात्र संघाला विजयापर्यंत नेण्यात अपयश आले.

सलमानची आतापर्यंतची टी-20 कारकीर्द

आगा सलमान हा अष्टपैलू फलंदाज आहे. त्याने पाकिस्तानसाठी आतापर्यंत २ टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत ४ विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीत मात्र विशेष काही करू शकलो नाही. त्याच्या एकूण टी-20 कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याने ७८ सामने खेळले आहेत. या कालावधीत ३८ विकेट्स घेतल्या आहेत.

यासोबतच १०९१ धावाही केल्या आहेत. आगा सलमानची टी-20 सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद ६८ धावा.

पाकिस्तानने मालिका गमावली

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला गेला. त्यात ऑस्ट्रेलियाने २९ धावांनी विजय मिळवला. यानंतर दुसरा सामना सिडनी येथे झाला. ऑस्ट्रेलियाने हा सामना १३ धावांनी जिंकला. रिझवान पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात तो १६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

Whats_app_banner