Pakistan Jersey For Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आता काही दिवसांवर आली आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. आता यजमान पाकिस्तान संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीची त्यांची जर्सी लॉंच केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या या जर्सीवर चाहत्यांकडून मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
अनेक चाहत्यांना जर्सी अजिबात आवडली नाही, त्यामुळे त्यांनी जर्सीची खूप खिल्ली उडवली आहे.
काही लोकांनी तर पाकिस्तानच्या या जर्सीला आयर्लंडच्या जर्सीची कॉपी म्हटले आहे. एका सोशल मीडिया युजरने म्हटले, की ही जर्सी एखाद्या क्लबच्या किटसारखी दिसत आहे. अशा प्रकारे जर्सीवर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीची पाकिस्तानची जर्सी चाहतेही खरेदी करू शकतात. चाहत्यांसाठी पाकिस्तानच्या नवीन जर्सीची किंमत ४० डॉलर ठेवण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ८ संघांची २ गटात विभागणी करण्यात आली आहे.
भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांना अ गटात ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानला ब गटात ठेवण्यात आले आहे.
पाकिस्तान चॅगतविजेता म्हणून म्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रवेश करेल. २०१७ मध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. आता पाकिस्तान संघ यावेळी कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ फेब्रुवारी रोजी सामना होणार आहे.
संबंधित बातम्या