मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Naseem Shah : पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, नसीम शाह वर्ल्डकपला मुकण्याची शक्यता

Naseem Shah : पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, नसीम शाह वर्ल्डकपला मुकण्याची शक्यता

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 16, 2023 07:30 PM IST

Naseem Shah world cup 2023 : विश्वचषकापूर्वी वेगवान गोलंदाज नसीम शाहच्या रूपाने पाकिस्तानला मोठा धक्का बसू शकतो. आशिया चषकात दुखापत झालेला नसीम आता एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधूनही बाहेर जाऊ शकतो.

Naseem Shah ruled out world cup 2023
Naseem Shah ruled out world cup 2023 (AP)

Naseem Shah may ruled out from odi world cup 2023 : पुढील महिन्यात भारतात वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या वनडे विश्वचषकापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला सर्वात मोठा धक्का बसू शकतो. एका रिपोर्ट्सनुसार, टीमचा स्टार फास्ट बॉलर नसीम शाहला वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. २० वर्षीय नसीम शाहला आशिया चषकात भारताविरुद्धच्या सामन्यात खांद्याला दुखापत झाली होती.

ट्रेंडिंग न्यूज

दुखापतीमुळे नसीम श्रीलंकेविरुद्धचा महत्वाचा सामना खेळू शकला नव्हता आणि त्यामुळे पाकिस्तानला आशिया कपमधून बाहेर पडावे लागले.

भारताविरुद्धच्या सामन्यात नसीम शाहला ४६व्या षटकात दुखापत झाली. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. नसीम शाहच्या खांद्याला दुखापत झाली आहे. 'ESPNcricinfo' च्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नसीमवर त्वरित कारवाई केली आणि दुबईमध्ये त्याचे स्कॅनिंग केले. स्कॅनमध्ये असे काही गंभीर संकेत मिळाले आहेत, की नसीम वर्षभर क्रिकेटपासून दूर राहू शकतो. याचा अर्थ नसीम शाहचे वर्ल्ड कपमधून बाहेर पडणे जवळपास निश्चित आहे.

विश्वचषकानंतर पाकिस्तानला डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. आता नसीम कसोटी मालिकेलाही मुकणार हे निश्चित आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या नसीमच्या दुसऱ्या स्कॅन रिपोर्टची वाट पाहत आहे, जे येत्या काही दिवसांत येऊ शकतो. दुसऱ्या स्कॅननंतरच दुखापत किती गंभीर आहे हे ठरवता येईल.

आशिया कपमध्ये जमान खानने घेतली नसीमची 

नसीम शाह आशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर जमान खानने त्याची जागा घेतली. मात्र, सुपर-4 मध्ये पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले, त्यानंतर त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. नसीम वर्ल्डकपमध्ये खेळू शकला नाही तर हा पाकिस्तानसाठी खूप मोठा धक्का असेल, तसेच संघासमोर अनेक अडचणी समस्या निर्माण होऊ शकतात. नसीम हा संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे.

WhatsApp channel
Cricket News मधील सर्व ताज्या घडामोडी Live Score सह Marathi News आणि प्रत्येक सामन्यागणिक बदलणारा पाहा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर