Virat Kohli and Anushka Sharma Become Parents: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची केवळ भारतातच नव्हेतर जगभरात चाहते आहेत. विराट कोहलीने त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माबाबत सोशल मीडियावर पोस्ट करताच जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. एवढेच नव्हेतर, पाकिस्तानतही विराट दुसऱ्यांदा बाबा झाल्याचे सेलिब्रेशन पाहायला मिळाले. पाकिस्तानमध्ये चाहत्यांनी मिठाई वाटत विराट अनुष्काच्या आनंदात भर घातली.
विराट कोहलीने मंगळवारी (२० जानेवारी २०२४) सोशल मीडियावर एक पोस्ट केली, ज्यात त्याने म्हटले आहे की, "१५ फेब्रुवारी रोजी आमच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले. ज्याचे नाव अकाय ठेवण्यात आले." यामुळेच विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विराटने माघार घेतली होती. त्यानंतर अखेरच्या तीन कसोटी सामन्यात विराट खेळताना दिसेल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, काही दिवसानंतर त्याने मालिकेतून माघार घेतली. अनुष्काने लंडनमध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. याबाबत विराटने माहिती देताच पाकिस्तानमधील त्याच्या चाहत्यांनी मिठाई वाटली.
विराटच्या पाकिस्तानमधील चाहत्यांचे म्हणणे आहे की, अकाय हा देखील क्रिकेटर झाला पाहिजे आणि त्याने विराटचे सगळे रेकॉर्ड मोडित काढले पाहिजे.लाहौरियन्ज नावाच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला, ज्यात अनेक पाकिस्तानी नागरिक विराट हा त्यांचा आवडता क्रिकेटपटू असल्याचे बोलत आहेत. विराट कोहलीचा मुलगा अकायचा फोटो शेअर करण्याची अनेक चाहते मागणी करत आहेत. अनेकांना विराट कोहलीच्या मुलाला पाहण्याची उस्तुकता लागली आहे.
व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, एक अँकर वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधताना दिसत आहे. विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा झाल्याने पाकिस्तानमधील नागरिकांच्या मिठाई वाटत आहे. विराट कोहली बाबा झाल्याचे ऐकून अनेक चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.