मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  USA vs IRE : यंदा ‘कुदरत का निजाम’, घडू शकला नाही, पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर, अमेरिका-आयर्लंड सामना रद्द

USA vs IRE : यंदा ‘कुदरत का निजाम’, घडू शकला नाही, पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर, अमेरिका-आयर्लंड सामना रद्द

Jun 14, 2024 11:27 PM IST

USA vs IRE match cancelled : अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना रद्द घोषित करण्यात आला आहे. खराब हवामान आणि पावसामुळे मैदानाची दुरवस्था झाल्याने नाणेफेकही होऊ शकली नाही.

USA vs IRE : यंदा कुदरत का निजाम घडू शकला नाही, पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर, अमेरिका-आयर्लंड सामना रद्द
USA vs IRE : यंदा कुदरत का निजाम घडू शकला नाही, पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर, अमेरिका-आयर्लंड सामना रद्द

 टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये ३० वा सामना शुक्रवारी (१४ जून) अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात होणार होता. पण हा सामना खराब हवामान आणि पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. फ्लोरिडाच्या लॉडरहिल भागात गेल्या अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडत होता. 

मॅच रेफ्रिंनी आणि पंचांनी अनेक वेळा मैदानाची परिस्थिती तपासली, परंतु यूएसए आणि आयर्लंड सामना भारतीय वेळेनुसार ९:३० वाजता रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले.

सामना रद्द झाल्यामुळे, यजमान यूएसएने T20 विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ मध्ये स्थान मिळवले आहे. या सामन्यामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आयर्लंडविरुद्धचा सामना रद्द झाल्यामुळे अमेरिकेला १ गुण मिळाला असून त्यांचे एकूण ५ गुण झाले आहेत. यासह यूएसएने २०२४ च्या T20 विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीत स्थान मिळवले आहे. 

आयर्लंड कोणत्याही किंमतीत यूएसएला पराभूत करेल अशी पाकिस्तान संघ आणि त्यांच्या चाहत्यांना आशा होती, कारण यूएसएचा पराभव झाल्यास, पाकिस्तान संघाच्या सुपर-८ च्या आशा जिवंत राहणार होत्या. पण सामना रद्द झाल्यामुळे पाकिस्तानचा संघ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. आता आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान जिंकला तरी पुढच्या फेरीत प्रवेश करू शकणार नाही.

अमेरिकेतील फ्लोरिडासह अनेक भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे. यापैकी एक लॉडरहिल परिसर आहे, जिथे यूएसए आणि आयर्लंड यांच्यातील सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर होणार होता. भारत आणि कॅनडा तसेच पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड सामनेही याच मैदानावर होणार आहेत. खराब हवामान आणि सततच्या पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. अशा स्थितीत अ गटातील उर्वरित तिन्ही सामने पावसामुळे रद्द होऊ शकतात.

अमेरिकेविरुद्ध हरल्याने समीकरण बिघडले

भारताने १२ जून रोजी अमेरिकेला हरवून सुपर-८ चे तिकीट आधीच बुक केले होते. आता या गटातून सुपर-८ गाठणारा अमेरिका हा दुसरा संघ ठरला आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानचा संघ टी-२० विश्वचषक-२०२२ मध्ये उपविजेता ठरला होता.

पाकिस्तान या विश्वचषकाच्या दावेदारांपैकी एक होता पण पहिल्याच सामन्यात या संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अमेरिकेने पहिल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला पराभूत करून मोठी खळबळ माजवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाला. इथेच सारे समीकरणच बिघडले.

कॅनडाचा पाकिस्तानने कसा तरी पराभव केला. त्यांची नजर आजच्या सामन्यावर होती कारण आज जर अमेरिका हरली असती आणि पाकिस्तानने शेवटचा सामना जिंकला असता तर पाकिस्तानचा संघ सुपर-८ मध्ये जाऊ शकला असता पण पाकिस्तानचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

WhatsApp channel