पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया सध्या चर्चेत आला आहे. दानिश कनेरियाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.
वास्तविक, दानिश कनेरियाने अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. मंदिराच्या अभिषेकाचा दिवस जवळ येत असल्याचे सांगत त्याने जय श्री रामचा नारा दिला आहे'.
दानिश कनेरियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आमचा राजा श्री राम याचे भव्य मंदिर तयार आहे आणि आता फक्त ८ दिवसांची प्रतीक्षा आहे.जय श्री राम."
कनेरियाने या पोस्टसोबत स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत तो भगवा झेंडा घेऊन उभा आहे. या ध्वजात रामाचे चित्र असून राम मंदिरही दिसत आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.
दानिश कनेरिया हा पाकिस्तानी हिंदू आहे. त्याचा जन्म कराची येथे झाला. २००० ते २०१० दरम्यान तो पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळला. तो मुख्य फिरकी गोलंदाज होता. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये २५० हून अधिक विकेट्स आहेत.
विशेष म्हणजे, अलीकडेच दानिश कनेरियाने पाकिस्तान संघाबाबत बरेच खुलासे केले होते. आपण खेळत असताना आपल्यासोबत भेदभाव झाल्याचेही त्याने सांगितले होते.
तसेच, तो सातत्याने भारताच्या समर्थनार्थ बोलत आहे. अलीकडेच मालदीव आणि भारत यांच्यातील वादाच्या वेळी त्याने एक पोस्टही टाकली होती. त्याने फक्त लक्षद्वीप लिहून एक फायर इमोजी पोस्ट केली होती.
संबंधित बातम्या