क्रिकेट विश्वात विराट कोहली आणि बाबर आझम यांच्यात बरीच तुलना झाली आहे. या दोन्ही खेळाडूंनी अनेक मोठे विक्रम केले आणि मोडले असून दोघांनीही आपल्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले आहेत. आता या विषयावर माजी पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विराट कोहली हा बाबर आझमपेक्षा सरस असल्यामुळे या दोन खेळाडूंमधील तुलना कोणत्याही प्रकारे योग्य नाही, असे त्याचे मत आहे.
कनेरिया म्हणाला, की "त्यांची तुलना कोण करत आहे? लोक त्याची विराटशी तुलना करताना पाहून मला कंटाळा आला आहे. तुम्ही तुलना करत असताना, विराट कोहलीने किती धावा केल्या आहेत हे देखील पहा. त्याने जगभरात धावा केल्या आहेत आणि तो खूप महान खेळाडू आहे."
दानिश कनेरिया म्हणाला की, विराट कोहली जेव्हा मैदानात येतो तेव्हा त्याची रुबाब वेगळा असतो, या बाबतीत बाबर त्याच्या जवळपासही नसतो, त्यामुळे तुलना करणे विसरून जा.
कनेरियाने पुढे सांगितले की, विराट आणि बाबर यांच्यातील तुलनेबाबत मला अनेकदा प्रश्न विचारण्यात आले आहेत, परंतु आपण कधीच दोघांची तुलना करत नाह. कारण आकडेवारी सर्व काही सांगते. दोघेही निवृत्त झाल्यावर तुम्ही त्यांच्या आकडेवारीवर ठरवा".
धावा आणि शतकांच्या बाबतीत विराट कोहली बाबर आझमपेक्षा खूप पुढे आहे. बाबर आझमने अलीकडेच टी-२० क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत कोहलीला मागे टाकले होते. पण विराट आणि रोहित शर्मा पुन्हा त्याच्या पुढे गेले आहेत.
दरम्यान, टी-20 क्रिकेटमध्येही विराट-बाबरची तुलना करणे योग्य नाही कारण माजी भारतीय कर्णधाराची सरासरी ४८ पेक्षा जास्त आहे, तर बाबरची सरासरी ४१ च्या आसपास आहे. दुसरीकडे, त्याच्या स्ट्राइक रेटमध्येही खूप फरक आहे.