मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sanju Samson : केएल राहुल राखीव तर संजू मुख्य संघात हवा, पाकिस्तानी स्टारचा सॅमसनला पाठिंबा

Sanju Samson : केएल राहुल राखीव तर संजू मुख्य संघात हवा, पाकिस्तानी स्टारचा सॅमसनला पाठिंबा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 26, 2023 11:03 AM IST

Sanju Samson asia cup 2023 : आशिया कप 2023 साठी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला पाकिस्तानी क्रिकेटरचा पाठिंबा मिळाला आहे. वास्तविक पाकिस्तानच्या माजी खेळाडूने संजू सॅमसनचा आशिया कपच्या संगात समावेश व्हायला हवा होता, असे म्हटले आहे.

Sanju Samson And KL Rahul
Sanju Samson And KL Rahul

Sanju Samson And KL Rahul : आशिया चषक 2023 साठी भारताने १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. दीर्घकाळ दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेल्या केएल राहुलचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर संजू सॅमसनला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

पण केएल राहुलच्या निवडीवर बरेच जण नाखूश आहेत. आहेत कारण संघ निवडताना केएल राहुल हा पूर्णपणे फिट नसल्याचे चीफ सिलेक्टर अजित आगरकरने सांगितले होते. यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी केएल राहुलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यात भारताचे माजी क्रिकेटर मदनलाल पासून ते आता माजी पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरिया यांचा समावेश आहे. 

दानिश कनेरिया नेमकं काय म्हणाला?

अनफिट केएल राहुलचा आशिया कपच्या संघात समावेश केल्याने संजू सॅमसनवर अन्याय झाल्याचे दानिश कनेरियाचे म्हणणे आहे. तो त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलत होता.

केएल राहुलऐवजी संजू सॅमसनचा संघात समावेश करायला हवा होता आणि केएल राहुलला राखीव खेळाडू म्हणून ठेवायला हवे होते, असे कनेरियाने म्हटले आहे. माजी पाकिस्तानी स्टारने राहुलच्या कसोटी आणि आयपीएल कामगिरीबद्दलही भाष्य केले.

दानिश कनेरिया म्हणाला, “केएल राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये कामगिरी केली नव्हती, त्यामुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले. त्यानंतर आयपीएलमध्येही तो धावा करण्यात अपयशी ठरला. त्याला दुखापत झाली आणि तो बरा झाल्यावर त्याला पुन्हा एकदा संघात प्रवेश मिळाला. हे योग्य नाही. जर टीम इंडियाने राहुलला दुसरी संधी दिली तर संजू सॅमसनही संघात असायला हवा. राहुल हा राखीव खेळाडू असावा. कदाचित केएळ राहुल हे इतके मोठे नाव झाले आहे की ते त्याला सोडू शकत नाहीत."

केएल राहुल पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही

केएल राहुल दुखापतीमुळे आशिया कपमधील सुरुवातीचे सामने खेळणार नाही. संघाची घोषणा करताना मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीच हे स्पष्ट केले होते.

संजूला संधीचे सोने करता आले नाही

दानिश कनेरिया पुढे म्हणाला की, संजूला अनेक संधी मिळाल्या, ज्याचा तो फायदा घेऊ शकला नाही. तो म्हणाला, “संजू पुन्हा एकदा ड्रिंक्स घेऊन जाईल. त्याच्याशी न्याय्य वागणूक मिळाली नाही असे बरेच जण म्हणतील, पण मला ते मान्य नाही. त्याला भरपूर संधी मिळाल्या, ज्या त्याने दोन्ही हातांनी पकडायला हव्या होत्या. संघात राहण्यासाठी तुम्हाला कामगिरी करावी लागेल.”

WhatsApp channel
Cricket News मधील सर्व ताज्या घडामोडी Live Score सह Marathi News आणि प्रत्येक सामन्यागणिक बदलणारा पाहा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर