Pakistani Players Private Dinner 25 Dollar : पाकिस्तानी संघ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडतो. सध्या पाकिस्तानी संघ टी-20 विश्वचषक २०२४ खेळण्यासाठी अमेरिकेत आहे. पाकिस्तानी संघ ६ जून रोजी टी-20 विश्वचषकात पहिला सामना खेळणार आहे. मात्र या सामन्याआधीच पाकिस्तानी संघाने एका खासगी डिनरचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात पाकिस्तानी चाहत्यांनाही बोलावण्यात आले होते. पण चाहत्यांना हा प्रवेश विनामूल्य नव्हता. पाकिस्तानी खेळाडूंना भेटण्यासाठी चाहत्यांकडून २५ डॉलर्स जमा करण्यात आले. पाकिस्तानचा माजी खेळाडू रशीद लतीफ याच्या एका व्हिडिओवरून हा खुलासा झाला आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ या बातमीने अजिबात खूश नाही. एका टीव्ही कार्यक्रमात त्याने संघ आणि व्यवस्थापनावर जोरदार टीका केली.
हा टीव्ही कार्यक्रम कामरान मुझफ्फरने होस्ट केला होता आणि त्यात पाकिस्तानी क्रिकेट वार्ताहर आणि लेखक नौमन नियाझ देखील होते. या अशा डिनरमुळे नियाजीही संतापलेले दिसले आणि त्यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना अशा कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल फटकारले.
व्हिडिओमध्ये रशीद लतीफ म्हणतो, की त्याने ऑफिशियरल डिनरबद्दल ऐकले आहे, परंतु ते एक खाजगी डिनर होते. पण असे कोण करते? हा मूर्खपणा आहे. याचा अर्थ तुम्ही आमच्या केवळ खेळाडूंना $२५ मध्ये भेटू शकता.
जर काही गडबड झाली असती, तर लोक म्हणाले असते की खेळाडू अशा प्रकारे पैसे कमवतात.
रशीद लतीफ पुढे म्हणाला की चॅरिटी डिनर आयोजित करण्याची कल्पना समजू शकतो. पण पैसे घेऊन खाजगी डिनर आयोजित करणे समजण्यापलीकडचे आहे.
लोक मला सांगतात की जो कोणी पाकिस्तानी खेळाडूंना फोन करतो. ते विचारतात किती पैसे देणार? आता ही प्रथा रूढ झाली आहे. जुना काळ वेगळा होता. पहिले २-३ डिनर आयोजित केले जायचे, ते पण अधिकृत असायचे.
मात्र आता ही गोष्ट खूप हायलाइट झाली आहे, कारण वर्ल्डकप सुरू आहे. तसेच, हा अमेरिकेचा दौरा आहे. त्यामुळे हे करताना पहिल्यांदा विचार करुन करायला हवे होते. हे चॅरिटी डिनर नव्हते. त्यात पाकिस्तानचे नाव, पाकिस्तान क्रिकेटचे नाव आहे. त्यामुळे अशा चूक करू नका."
टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानसह अ गटात आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिकेचे संघ आहेत. पाकिस्तानी संघ आपला पहिला सामना ६ जून रोजी अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. यानंतर ९ जून रोजी पाकिस्तानी संघ भारताविरुद्ध सामना खेळणार आहे. ११ जूनला कॅनडा आणि १६ जूनला आयर्लंडविरुद्ध सामने खेळणार आहेत.
संबंधित बातम्या