Asia Cup Records: पाकिस्तानचा मोहम्मद सामी आठवतो का? आशिया कपमध्ये टाकली १७ चेंडूंची ओव्हर, काय घडलं होतं? पाहा
Mohammad Sami 17 Balls Over : मोहम्मद सामीने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठे षटक टाकले होते. आशिया कपमध्ये त्याने १७ चेंडूंचे एक षटक टाकले होते. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात सामीने हा लज्जास्पद विक्रम आपल्या नावावर केला होता.
Asia Cup Mohammad Sami Longest 17 Balls Over : जागतिक क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक रोमहर्षक दृश्ये पाहायला मिळाली आहेत. क्रिकेटपटूंनी आतापर्यंत अनेक रंजक विक्रम केले आहेत. पण वर्ल्ड क्रिकेटमध्ये असे काही रेकॉर्ड्स आहेत जे क्वचितच कोणालाच नको आहेत. असाच एक नकोसा विक्रम पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद सामीच्या नावावर आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मोहम्मद सामीने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठे षटक टाकले होते. आशिया कपमध्ये त्याने १७ चेंडूंचे एक षटक टाकले होते. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात सामीने हा लज्जास्पद विक्रम आपल्या नावावर केला होता.
वास्तविक, आशिया कप २००४ चा १२वा सामना बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात सामीने पाकिस्तानसाठी तिसरे षटक टाकले. हे षटक सामीसाठी खूप वाईट ठरले. हे षटक पूर्ण करण्यासाठी त्याने १७ चेंडू टाकले.
नो-वाईडसह षटकात एकूण १७ चेंडू टाकले
सामीच्या षटकातील पहिला चेंडू वाईड होता. यानंतर पुढच्या चेंडूवर चौकार आला. तर पुढच्या चेंडूवर सामीने पुन्हा २ धावा दिल्या. यानंतर त्याने नो बॉल आणि वाईड बॉल टाकले. यापुढच्या चेंडूवर सामीने पुन्हा एक धाव दिली. यानंतर आणखी एक नो बॉल टाकला. मग वाईड टाकला आणि शेवटी डॉट बॉल टाकला. अशाप्रकारे त्याने १७ चेंडूंचे एक षटक टाकले. एकदिवसीय क्रिकेटमधील हे सर्वात मोठे षटक ठरले.
विशेष म्हणजे या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना १६६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ४ विकेट्स राखून सामना जिंकला. बांगलादेशकडून एकच अर्धशतक झाले. खालिद मसूदने संघाकडून सर्वाधिक ५४ धावा केल्या. यादरम्यान सामीने पाकिस्तानकडून ८.२ षटकात २ बळी घेतले. त्याने ३८ धावा दिल्या होत्या. पाकिस्तानकडून शोएब मलिकने ४८ धावा केल्या. मोहम्मद युसूफने ३९ धावा केल्या होत्या. अब्दुल रझाकने नाबाद १६ धावा केल्या.