India vs Pakistan Hong Kong Sixes : हॉंगकॉंग सुपर ६० क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. यासह पाकिस्तानने साखळी स्टेजमधील आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. यापूर्वी त्यांनी यूएई आणि आता टीम इंडियाचा पराभव केला आहे. हे दोन्ही सामने जिंकून पाकिस्तानने पुढील फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.
तर भारताला आपल्या पहिल्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला. तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ षटकांत ११९ धावा केल्या, पण तरीही पाकिस्तानने अवघ्या ३० चेंडूत सामना जिंकला. पाकिस्तानकडून आसिफ अलीने १४ चेंडूत ५५ धावा केल्या. अखलाकने १२ चेंडूत ४० धावांची खेळी केली. भारताकडून भरत चिपळीने १६ चेंडूत सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली.
पहिले षटक- पाकिस्तान संघानेही वेगवान सुरुवात केली आणि स्टुअर्ट बिन्नीच्या षटकात २१ धावा केल्या. आसिफ अलीने २ षटकार ठोकले. अखलाकने एक चौकार मारला.
दुसरे षटक- दुसऱ्या षटकात पाकिस्तानने २३ धावा केल्या. केदार जाधवच्या षटकात आसिफ अलीने ३ षटकार ठोकले.
तिसरे षटक- शाहबाज नदीमच्या षटकात पाकिस्तानी फलंदाजांनी २४ धावा केल्या. मोहम्मद अखलाकने या षटकात ३ षटकार आणि १ चौकार लगावला.
चौथे षटक- मनोज तिवारीनेही एका षटकात २० धावा दिल्या. यावेळी आसिफ अली आणि अखलाक यांनी मिळून २ षटकार आणि १ चौकार लगावला.
पाचवे षटक- आसिफ अलीने १४ चेंडूत ५५ धावा केल्या. शाहबाज नदीमच्या षटकात आसीफ आणि अखलाक यांनी ४ षटकार आणि २ चौकार लगावले. परिणामी षटकात ३३ धावा आल्या आणि टीम इंडियाने सामना गमावला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ षटकांत ११९ धावा केल्या होत्या. भरत चिपळीने सर्वाधिक ५३ धावांची खेळी खेळली. त्याने १६ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकार ठोकले. कर्णधार रॉबिन उथप्पानेही अवघ्या ८ चेंडूत ३१ धावा केल्या. उथप्पाने ३ षटकार आणि ३ चौकार मारले. मनोज तिवारीने ७ चेंडूत १७ धावांची नाबाद खेळी केली. स्पर्धेच्या नियमांनुसार एका सामन्यात ६ खेळाडू खेळू शकतात. सामनाही ६-६ षटकांचा असतो.
पहिले षटक- पहिल्या षटकात भारताने पहिल्याच षटकात २७ धावा केल्या. आमिर यामीनच्या पहिल्या पाच चेंडूंवर रॉबिन उथप्पाने ३ चौकार आणि २ षटकार ठोकले.
दुसरे षटक – फहीम अश्रफच्या पहिल्या चेंडूवर रॉबिन उथप्पाने षटकार मारला पण दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. यानंतर केदार जाधवने लागोपाठ २ चौकार मारले आणि शेवटच्या चेंडूवर मनोज तिवारीने चौकार मारला आणि या षटकात संघाच्या १८ धावा झाल्या.
तिसरे षटक - पाकिस्तानचा लेगस्पिनर शादाब खानने शानदार गोलंदाजी केली आणि फक्त ८ धावा दिल्या.
चौथे षटक – फहीम अश्रफच्या षटकात ३२ धावा झाल्या. भरत चिपळीने या षटकात ४ षटकार आणि १ चौकार लगावले.
पाचवे षटक- हुसेन तलतच्या षटकात १४ धावा आल्या. मनोज तिवारीने पहिल्या दोन चेंडूंवर एक चौकार आणि १ षटकार ठोकला