Pakistan Vs New Zealand 2nd T20 Scorecard : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टन येथे खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकात ८ बाद १९४ धावा केल्या आहेत. पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी १९५ धावा करायच्या आहेत.
न्यूझीलंडकडून सलामीवीर फलंदाज फिन अॅलनने सर्वाधिक ७४ धावा ठोकल्या. त्याने अवघ्या ४१ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकार मारले. फिन अॅलन आणि डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी ५ षटकात ५९ धावा जोडल्या.
कॉनवे २० धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि फिन अॅलनने संघाची धावगती कमी होऊ दिली नाही. विल्यमसन १५ चेंडूत २६ धावा करून रिटायर्ड हर्ट झाला.
यानंतर फिन अॅलनदेखील ७१ धावा करून बाद झाला. न्यूझीलंडला या सामन्यातही २०० धावांचा टप्पा गाठण्याची संधी होती. पण त्यांचे मधल्या फळीतील फलंदाज विशेष काही करून शकले नाहीत.
शेवटी मिचेल सँटनरने थोडीफार फटकेबाजी करत संघाला १९४ धावांपर्यंत पोहोचवले. सँटनरने १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. तर डॅरिल मिशेल १७ आणि ग्लेन फिलिप्सने १३ धावा केल्या.
पाकिस्तानकडून हारिस रौफने ३ तर अब्बास आफ्रिदीने २ विकेट घेतले. शाहीन आफ्रिदीला एकही विकेट मिळाली नाही.
न्यूझीलंड: फिन अॅलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, टिम साऊदी, इश सोधी, बेन सियर्स.
पाकिस्तानः सॅम अयुब, मोहम्मद रिझवान, बाबर आझम, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आझम खान (विकेटकीपर), आमिर जमाल, शाहीन आफ्रिदी (कर्णधार), उसामा मीर, अब्बास आफ्रिदी, हरिस रौफ.
संबंधित बातम्या