babar azam century vs nepal asia cup 2023 : आशिया कपच 2023 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळसमोर धावांचे ३४३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम आणि इफ्तिकार अहमद यांनी वादळी शतकी खेळी खेळली.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानने निर्धारित ५० षटकांत ६ बाद ३४२ धावा केल्या. त्यांच्याकडून बाबर आझमने सर्वाधिक १५१ धावा केल्या. त्याने १३१ चेंडूंच्या खेळीत १४ चौकार आणि ४ षटकार मारले. तर इफ्तिखार अहमदने ७१ चेंडूत १०९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकार मारले. बाबरच्या कारकिर्दीतील हे १९ वे शतक आहे. त्याचवेळी इफ्तिखारने आपले पहिलेच वनडे शतक झळकावले.
तत्पूर्वी, एकावेळी पाकिस्तानने नेपाळविरुद्ध १२४ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या, तेव्हा बाबर-इफ्तिखारने डाव सांभाळला. बाबर आणि इफ्तिकार यांच्यात ५ व्या विकेटसाठी वादळी २१४ धावांची भागिदारी झाली.
बाबर इफ्तिकारशिवाय पाकिस्तानकडून यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने ४४ धावांचे योगदान दिले. फखर जमान १४ धावा करून बाद झाला. तर सलामीवीर इमाम उल हक आणि फखर झमानने १२ धावा केल्या. यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या आगा सलमानने प्रत्येकी ५ धावा केल्या. तर शादाब खान ४ धावा करून डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. नेपाळकडून सोमपाल कामीने २ बळी घेतले. करण केसी आणि संदीप लामिछाने यांना प्रत्येकी १ विकेट घेतला.