PAK vs CAN Live Streaming : पाकिस्तानला शेवटची संधी, आज कॅनडाला भिडणार, सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PAK vs CAN Live Streaming : पाकिस्तानला शेवटची संधी, आज कॅनडाला भिडणार, सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

PAK vs CAN Live Streaming : पाकिस्तानला शेवटची संधी, आज कॅनडाला भिडणार, सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

Jun 11, 2024 11:56 AM IST

Pakistan vs Canada T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक २०२४ आतापर्यंत पाकिस्तानसाठी दुःस्वप्नापेक्षा कमीराहिलेला नाही. संघाने सुरुवातीचे दोन्ही साखळी सामने गमावले आहेत. आता त्यांची तिसरी लढत कॅनडाशी आहे.

PAK vs CAN Live Streaming : पाकिस्तानला शेवटची संधी, आज कॅनडाला भिडणार, सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या
PAK vs CAN Live Streaming : पाकिस्तानला शेवटची संधी, आज कॅनडाला भिडणार, सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या (REUTERS)

PAK vs CAN Live Streaming : टी-20 विश्वचषक २०२४ चा २२ वा सामना पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. हा भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळला जाईल. दोन्ही संघ न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येतील. 

पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर लाइव्ह पाहता येईल. तसेच, मोबाईलवर हॉटस्टार अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही पाकिस्तान-कॅनडा सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग पाहू शकता.

दरम्यान, पाकिस्तानला टी-20 विश्वचषकात स्वतःला कायम ठेवण्याची ही शेवटची संधी असेल. जर पाकिस्तान आज कॅनडाविरुद्धही हरला तर त्यांना २०२४ च्या टी-20 विश्वचषकाला ग्रुप स्टेजमधूनच अलविदा म्हणावा लागेल.

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये पहिले दोन सामने हरला आहे. या संघाने अमेरिकेविरुद्ध पहिला सामना गमावला, जिथे त्यांचा सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला. यानंतर बाबर सेनेने भारताविरुद्धचा दुसरा सामनाही हरला. आता संघाला गट टप्प्यातील तिसरा सामना कॅनडाविरुद्ध खेळायचा आहे. पाकिस्तानने आज कॅनडाविरुद्धचा सामनाही हरला तर ते सुपर-८ साठी पात्र ठरू शकणार नाही.

या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होत असून त्यांची ४ गटात विभागणी करण्यात आली आहे. सर्व गटातील टॉप-२ संघ सुपर-८ मध्ये प्रवेश करतील. 'ग्रुप-ए'मध्ये असलेल्या पाकिस्तानवर सुपर-८ मध्ये पोहोचण्याबाबत आधीच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा स्थितीत आज त्यांना सुपर-८ च्या आशा जिवंत ठेवण्यासाठी कॅनडाविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल. 

यानंतर पाकिस्तान १६ जून रोजी आयर्लंडविरुद्ध चौथा म्हणजेच ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना खेळणार आहे. मात्र, आज कॅनडाविरुद्ध विजय मिळवला तरच आयर्लंडविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आता कॅनडाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कॅनडाने आयर्लंडला पराभूत केले

विशेष म्हणजे, या विश्वचषकात आतापर्यंत तीन अपसेट पाहायला मिळाले आहेत, त्यापैकी एक कॅनडाने आयर्लंडचा पराभव करून केला होता. न्यू यॉर्कमध्ये झालेल्या सामन्यात कॅनडाने आयरिश संघाचा १२ धावांनी पराभव केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या