मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PAK Vs CAN : आमिर-रौफच्या तुफानी गोलंदाजी; जॉन्सनची दमदार फिफ्टी, पाकिस्तानसमोर १०७ धावांचे लक्ष्य

PAK Vs CAN : आमिर-रौफच्या तुफानी गोलंदाजी; जॉन्सनची दमदार फिफ्टी, पाकिस्तानसमोर १०७ धावांचे लक्ष्य

Jun 11, 2024 09:47 PM IST

PAK Vs CAN T20 Scorecard : टी-20 विश्वचषक २०२४ चा २२ वा सामना पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यात खेळला जात आहे. बाबर आझमच्या संघासाठी हा सामना करा किंवा मरो'चा आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

PAK Vs CAN : आमिर-रौफच्या तुफानी गोलंदाजी; जॉन्सनची दमदार फिफ्टी, पाकिस्तानसमोर १०७ धावांचे लक्ष्य
PAK Vs CAN : आमिर-रौफच्या तुफानी गोलंदाजी; जॉन्सनची दमदार फिफ्टी, पाकिस्तानसमोर १०७ धावांचे लक्ष्य (PTI)

PAK Vs CAN T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक २०२४ चा २२ वा सामना पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यात खेळला जात आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर कॅनडाने निर्धारित २० षटकात ७ बाद १०६ धावा केल्या आहेत. पाकिस्तानला विजयासाठी १०७ धावा करायच्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

पाकिस्तान संघासाठी हा सामना करा किंवा मरो'चा आहे. वर्ल्डकपमधील आव्हान कायम ठेवायचे असेल, तर पाकिस्तानला हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल.

कॅनडाकडून ॲरॉन जॉन्सनने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ४४ चेंडूत ५२ धावा केल्या, त्यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ४ षटकारही मारले. संघाने सातत्याने विकेट्स गमावल्या, त्यामुळे ९ पैकी ६ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. पाकिस्तानकडून तगडी गोलंदाजी झाली. सर्वच गोलंदाजाचा इकॉनॉमी रेट ७ च्या खाली होता. पाकिस्तान संघाकडून मोहम्मद आमिर आणि हॅरिस रौफ यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या, या दोघांनी २-२ विकेट घेतल्या.

कॅनडासाठी पहिली २ षटके खूपच चांगली होती, मात्र तिसऱ्या षटकात नवनीत धालीवाल ४ धावा काढून बाद झाला. यानंतर कॅनडा सावरू शकला नाही. कारण त्यांचे नियमित अंतराने विकेट पडत गेले.

 पॉवरप्लेमध्ये कॅनडाने ६ षटकात संघाने २ गडी गमावून ३० धावा केल्या होत्या. त्यानंतर संघाने १० षटकात ५५ धावात ४ मोठ्या विकेट गमावल्या होत्या.

चांगल्या फॉर्मात असलेले निकोलस किर्टन आणि श्रेयस मोवा हे देखील अनुक्रमे १ आणि २ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. दरम्यान, ॲरॉन जॉन्सनने ३९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. १४व्या षटकात नसीम शाहने जॉन्सनला क्लीन बोल्ड केले तेव्हा परिस्थिती सुधारायला सुरुवात झाली होती. १५ षटकांत कॅनडाने ६ गडी गमावून ७७ धावा केल्या होत्या. कर्णधार साद बिन जफरने डावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तो २१ चेंडूत १० धावा करून बाद झाला.

डिलन हेलिगर आणि कलीम सना यांनी अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजी केली, पण ते संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊ शकले नाहीत. शेवटच्या षटकांमध्ये कलीम सनाने १३ धावा आणि डिलन हेलिगरने ९ धावा करत कॅनडाचा डाव १०६ धावांपर्यंत नेला.

टी-२० वर्ल्डकप २०२४