पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीत खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली.
अवघ्या १६ धावांवर संघाने पहिले तीन विकेट गमावल्या. पाकिस्तानची तिसरी विकेट बाबर आझमच्या रूपाने पडली. तो शून्यावर बाद झाला. शरीफुल इस्लामने बाबरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बाबर आऊट झाल्यानंतर तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
अब्दुल्ला शफीक आणि सॅम अयुब रावळपिंडीत पाकिस्तानकडून सलामीला आले. यादरम्यान शफिक अवघ्या २ धावा करून बाद झाला. यानंतर लगेचच शान मसूद पॅव्हेलियनमध्ये परतला. पाकिस्तानची तिसरी विकेट बाबरच्या रूपाने पडली. २ चेंडूंचा सामना करताना तो शून्यावर बाद झाला. बाबर आऊट झाल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी त्याला ट्रोल केले.
खरंतर बाबर आझमचे चाहते त्याची तुलना विराट कोहलीसोबत करतात. कोहली आणि बाबर यांची तुलना करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण आता तो शून्यावर आऊट झाल्यावर ट्रोल झाला. कोहलीच्या एका चाहत्याने लिहिले, की"याला फक्त झिम्बाब्वेसोबतच खेळवा.'' या पोस्टसोबत इतरही पोस्ट शेअर केल्या आहेत.
पाकिस्तान- अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली.
बांगलादेश- नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, नाहिद राणा.