Afghanistan vs Pakistan, 1st ODI : आशिया कप 2023 आधी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेतील हंबनटोटा येथे खेळवला जात आहे. आशिया चषक ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याआधी ही एकदिवसीय मालिका संपेल.
दरमयान, पहिल्या वनडेत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांची वाईट अवस्था केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तान संघाला पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत. अफगाणिस्तानच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या ४७.१ षटकांत २०१ धावांत गारद झाला. पाकिस्तानकडून इमाम-उल-हकने सर्वाधिक धावा केल्या. इमामने ९४ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने ६१ धावांची धडाकेबाज खेळी केली. याशिवाय शादाब खानने ३९ आणि इफ्तिखार अहमदने ३० धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचे फलंदाज अफगाणिस्तानी गोलंदाजांसमोर अपयशी ठरले. सलामीवीर फखर जमान २, बाबर आझम शुन्य, आगा सलमान ७ आणि मोहम्मद रिझवान २१ धावा करून बाद झाले.
पाकिस्तानने केवळ ६२ धावांत चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर पाकिस्तानचा निम्मा संघ ११२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर इमाम, इफ्तिकार आणि शादाब खानने संघाला कसाबसा २०० चा आकडा गाठून दिला.
अफगाणिस्तानकडू ऑफस्पिनर मुजीब उर रहमानने ३ विकेट घेतल्या. त्याने बाबर आणि रिझवानशिवाय मुजीबने उसामा मीरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचवेळी मोहम्मद नबी आणि राशिद खान यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. याशिवाय रहमत शाह आणि फजलहक फारुकी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.
आशिया कप ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे होणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान, आशिया कपसाठी सोमवारी भारतीय संघातील खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारतीय संघ आशिया चषकाच्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ सप्टेंबरला सामना होणार आहे. आशिया कप 2023 मध्ये भारत-पाकिस्तान व्यतिरिक्त ६ संघ सहभागी होत आहेत.
या संघांमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ यांचा समावेश आहे. या संघांमध्ये एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत.