मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PAK vs AFG ODI : हरिस रौफ-शाहीनसमोर अफगाणिस्तान ५९ धावांत गारद, पाकिस्तानने पहिला सामना जिंकला

PAK vs AFG ODI : हरिस रौफ-शाहीनसमोर अफगाणिस्तान ५९ धावांत गारद, पाकिस्तानने पहिला सामना जिंकला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 22, 2023 11:00 PM IST

Afghanistan vs Pakistan, 1st ODI : पाकिस्तानकडून हरिस रौफने उत्कृष्ट गोलंदाजी करताना ५ बळी घेतले. हरिसने ६.२ षटकात केवळ १८ धावा देत ५ बळी घेतले. याशिवाय शाहीन आफ्रिदीच्या खात्यात दोन, तर नसीम शाह आणि शादाब खानने प्रत्येकी एक विकेट घेतली.

PAK vs AFG 1st ODI
PAK vs AFG 1st ODI (AFP)

Afghanistan vs Pakistan, 1st ODI : आशिया कप 2023 आधी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (२२ ऑगस्ट) श्रीलंकेतील हंबनटोटा येथे खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा वाईट पद्धतीने पराभव केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २०१ धावा केल्या होत्या. यानंतर २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ हारिस रौफ आणि शाहीन आफ्रिदीच्या धडाकेबाज गोलंदाजीसमोर केवळ ५९ धावांवर गारद झाला. 

अशा प्रकारे पाकिस्तानने पहिला वनडे १४२ धावांनी जिंकला. या विजयासह पाकिस्तानने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली आहे. 

पाकिस्तानचीही फलंदाजी खराब झाली

पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. अफगाणिस्तानी गोलंदाजांनी त्यांची अवस्थाही बिकट केली होती. पाकिस्तानविरुद्ध फखर जमान, बाबर आझम आणि आगा सलमान स्वस्तात बाद झाले. मात्र, सलामीवीर इमाम-उल-हकने शानदार ६१ धावा केल्या. 

याशिवाय मधल्या फळीत इफ्तिखार अहमद आणि शादाब खान यांनीही महत्त्वपूर्ण खेळी खेळली. इफ्तिखारने ३० धावांची खेळी खेळली. याशिवाय शादाब खानने ३९ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी नसीम शाहनेही १८ धावांची खेळी केली.

 पाकिस्तानी गोलंदाजांसमोर अफगाणी फलंदाज ढेर

पाकिस्तानी संघाने अफगाणिस्तानला २०२ धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या ३ धावांवर संघाची पहिली विकेट पडली. यानंतर अफगाणिस्तानचा एकही फलंदाज जास्तवेळ क्रीजवर टिकला नाही.

अफगाणिस्तानचा अर्धा संघ अवघ्या ३५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अफगाणिस्तानसाठी रहमानउल्ला गुरबाज आणि अजमतुल्ला उमरझाई हे एकमेव फलंदाज होते जे दुहेरी आकडा पार करू शकले. अशाप्रकारे अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या १९.२ षटकांत ५९ धावांत गारद झाला.

हरिस रौफने ५ बळी घेतले

पाकिस्तानकडून हरिस रौफने उत्कृष्ट गोलंदाजी करताना ५ बळी घेतले. हरिसने ६.२ षटकात केवळ १८ धावा देत ५ बळी घेतले. याशिवाय शाहीन आफ्रिदीच्या खात्यात दोन, तर नसीम शाह आणि शादाब खानने प्रत्येकी एक विकेट घेतली.

WhatsApp channel
Cricket News मधील सर्व ताज्या घडामोडी Live Score सह Marathi News आणि प्रत्येक सामन्यागणिक बदलणारा पाहा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर