On This Day : हातातोंडाशी आलेला घास ट्रॅव्हिस हेडनं हिरावला, आजच्या दिवशी पॅट कमिन्सनं कोट्यवधी भारतीयांना रडवलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  On This Day : हातातोंडाशी आलेला घास ट्रॅव्हिस हेडनं हिरावला, आजच्या दिवशी पॅट कमिन्सनं कोट्यवधी भारतीयांना रडवलं

On This Day : हातातोंडाशी आलेला घास ट्रॅव्हिस हेडनं हिरावला, आजच्या दिवशी पॅट कमिन्सनं कोट्यवधी भारतीयांना रडवलं

Nov 19, 2024 12:11 PM IST

आजच्याच दिवशी म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. या जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

On This Day : हाता तोंडाशी आलेला घास ट्रॅव्हिस हेडनं हिरावला, आजच्या दिवशी पॅट कमिन्सनं कोट्यवधी भारतीयांना रडवलं
On This Day : हाता तोंडाशी आलेला घास ट्रॅव्हिस हेडनं हिरावला, आजच्या दिवशी पॅट कमिन्सनं कोट्यवधी भारतीयांना रडवलं (PTI)

गेल्या वर्षभरापासून भारतीय क्रिकेट चाहते १९ नोव्हेंबर हा दिवस विसरू शकले नाहीत. १९ नोव्हेंबर हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील काळा दिवस मानण्यात येतो. कारण वर्षभरापूर्वी याच दिवशी वनडे वर्ल्डकप २०२३ ची फायनल झाली होती, आणि त्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला होता.

भारतीय क्रिकेट संघ गेल्या वर्षी म्हणजेच या दिवशी (१९ नोव्हेंबर) २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत हरला होता. भारताच्या पराभवामुळे १४० कोटी भारतीय चाहत्यांची मनं तुटली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यातील भारताचा पराभव कोणालाच पचवता आला नाही.

कारण, वनडे वर्ल्डकप २०२३ च्या फायनलमध्ये पोहोचेपर्यंत टीम इंडियाने एकही सामना गमावला नव्हता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अंतिम फेरी गाठण्यापूर्वी सलग ९ साखळी सामने जिंकले होते. त्यानंतर उपांत्य फेरीतील सलग १० वा सामना जिंकला.

उपांत्य फेरीत, टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता, जे त्यांच्यासाठी आयसीसी स्पर्धांमध्ये नेहमीच मोठे आव्हान होते. न्यूझीलंडसारख्या संघाला उपांत्य फेरीत पराभूत केल्यानंतर टीम इंडिया सहज फायनल जिंकून एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावेल, अशी अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही.

ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी केली

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला २४० धावांत गुंडाळले. या काळात टीम इंडियाचे बहुतांश फलंदाज फ्लॉप दिसले.

गोलंदाजीतील चमकदार कामगिरीनंतर, ऑस्ट्रेलियाने फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी दाखवली आणि अवघ्या ४३ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात २४३ धावा करून विजय मिळवला. यावेळी संघाकडून सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने दमदार खेळी करत १२० चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १३७ धावा केल्या. 

याशिवाय मार्नस लॅबुशेनने संयमी खेळी खेळली आणि ११० चेंडूत ४ चौकारांसह ५८ धावा केल्या. अशा प्रकारे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने मायदेशात भारताचा पराभव करून विश्वचषक जिंकला.

Whats_app_banner