Ollie Pope Century : इंग्लंडच्या ऑली पोपचं झुजार शतक, हैदराबाद कसोटीची रंगत वाढली
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ollie Pope Century : इंग्लंडच्या ऑली पोपचं झुजार शतक, हैदराबाद कसोटीची रंगत वाढली

Ollie Pope Century : इंग्लंडच्या ऑली पोपचं झुजार शतक, हैदराबाद कसोटीची रंगत वाढली

Published Jan 27, 2024 04:16 PM IST

Ollie Pope Century : हैदराबाद कसोटी सामन्यात ऑली पोपने दमदार शतकी खेळी केली आहे. या शतकामुळे कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे.

Ollie Pope Century
Ollie Pope Century (AFP)

India vs England 1st Test Day 3 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादेत खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या ओली ओपने शानदार शतक केले आहे. ओली पोपने १५४ चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या. 

ओली पोपचे कसोटी क्रिकेटमधील हे पाचवे शतक आहे. इंग्लंडकडून खेळताना त्याने दुसऱ्या डावात पहिल्यांदाच शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. यासोबतच ऑली पोपने भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये एक खास विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

ओली पोप २०१८ नंतर केवळ दुसरा परदेशी फलंदाज ठरला आहे, ज्याने टीम इंडियाविरुद्ध भारतीय भूमीवर दुसऱ्या डावात शतक केले आहे. ओली पोपच्या आधी श्रीलंकेचा फलंदाज दिमुथ करुणारत्नेने अशी कामगिरी केली होती. करुणारत्नेने २०२२ मध्ये  बेंगळुरू कसोटीत दुसऱ्या डावात शतक झळकावले होते.

ऑली पोपने इंग्लंडचा डाव सावरला

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सतत विकेट पडत होत्या. पण तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या पोपने एक बाजू लावून धरली. बेन स्टोक्स बाद झाल्यानंतर पोपने बेन फॉक्ससोबत संयमी फलंदाजी करत १०० हून अधिक धावांची भागीदारी केली. ऑली पोपच्या दमदार फलंदाजीमुळे इंग्लंडच्या संघाने भारतावर आघाडी मिळवण्यात यश मिळवले आहे. 

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या कसोटी सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २४६ धावा केल्या. यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावात रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ४३६ धावा केल्या. अशा प्रकारे टीम इंडियाने इंग्लंडवर १९० धावांची भक्कम आघाडी मिळवली.

पण यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने दमदार पुनरागमन करत भारतीय गोलंदाजांना कडवी टक्कर देण्यात यश मिळवले.

दुसऱ्या डावातही इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज जॅक क्राउली आणि बेन डकेट यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी झाली. बेन डकेट ४५ धावा करून बाद झाला तर जॅक क्रॉलीने ३१ धावांचे योगदान दिले. पण जो रूट आणि बने स्टोक्स स्वस्ता बाद झाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या