मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  वनडे वर्ल्डकप २०२७ साठी पात्रतेची जंग सुरू, ४ जागांसाठी २२ संघ भिडणार, असं आहे संपूर्ण गणित, पाहा

वनडे वर्ल्डकप २०२७ साठी पात्रतेची जंग सुरू, ४ जागांसाठी २२ संघ भिडणार, असं आहे संपूर्ण गणित, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 28, 2024 02:29 PM IST

ODI World Cup 2027 : एकदिवसीय विश्वचषक २०२७ दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण १४ संघ सहभागी होणार असून ५४ सामने खेळवले जाणार आहेत.

**EDS, YEARENDERS 2023: CRICKET WORLD CUP** Ahmedabad: India's captain Rohit Sharma during the presentation ceremony of the ICC Men�s Cricket World Cup 2023 at the Narendra Modi Stadium, in Ahmedabad, Sunday, Nov. 19, 2023. Australia won the match to lift the trophy. (PTI Photo/Ravi Choudhary)(PTI12_24_2023_000068A)
**EDS, YEARENDERS 2023: CRICKET WORLD CUP** Ahmedabad: India's captain Rohit Sharma during the presentation ceremony of the ICC Men�s Cricket World Cup 2023 at the Narendra Modi Stadium, in Ahmedabad, Sunday, Nov. 19, 2023. Australia won the match to lift the trophy. (PTI Photo/Ravi Choudhary)(PTI12_24_2023_000068A) (PTI)

ODI World Cup 2027 Qualification Process : पुढचा वनडे वर्ल्डकप २०२७ मध्ये खेळला जाणार आहे. पण पुढील एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याासाठी पात्रतेची लढाई आतापासूनच सुरू झाली आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या विश्वचषकाचे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे देश घेणार आहेत.

यजमानपदासह रँकिंगच्या आधारे एकूण ८ संघ थेट वर्ल्डकपसाठी पात्र ठरतील, तर एकूण २२ संघ उर्वरित ४ स्थानांसाठी लढतील. वन डे वर्ल्ड कप लीग-2 मध्ये एकूण २४ तिरंगी मालिका खेळल्या जाणार आहेत.

वनडे वर्ल्डकप २०२७ कुठे होणार, किती सामने होणार?

एकदिवसीय विश्वचषक २०२७ दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण १४ संघ सहभागी होणार असून ५४ सामने खेळवले जाणार आहेत. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान विश्वचषकाचे सामने होण्याची शक्यता आहे.

वनडे वर्ल्डकप २०२७ साठी किती संघ थेट पात्र ठरतील?

एकदिवसीय विश्वचषक २०२७ चे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांना आहे. त्यामुळे हे संघ थेट पात्र ठरतील. तसेच, आयसीसी रँकिंगमधील टॉप ८ संघांनाही थेट वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

लीग-2 मध्ये कोणते संघ असतील?

दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेसह २०२७ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणाऱ्या नामिबियालाही लीग-2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. नामिबियाशिवाय नेदरलँड्स, यूएई, अमेरिका, नेपाळ आणि ओमान यांना लीग-2 मध्ये ठेवण्यात आले आहे, जे गेल्या विश्वचषक पात्रता फेरीत खेळताना दिसले होते.

कॅनडाच्या संघाला प्रमोशन मिळाले असून ते आता चॅलेंज लीगमधून लीग-2 मध्ये गेले आहेत. या संघांमध्ये एकूण ९ तिरंगी मालिका खेळल्या जाणार आहेत, जी डिसेंबर २०२६ पर्यंत संपेल. प्रत्येकी ४ सामन्यांमध्ये एकूण ८ संघ आमनेसामने असतील. म्हणजेच या ८ संघांमध्ये एकूण १४४ एकदिवसीय सामने होणार आहेत.

चॅलेंज लीगमध्ये कोणते संघ सहभागी होतील?

पीएनजी, जर्सी, डेन्मार्क, केनिया, हाँगकाँग, कतार, सिंगापूर, युगांडा यांना चॅलेंज लीगमध्ये स्थान देण्यात आले आहे. यासह बर्म्युडा, इटली, कुवेत, सौदी, बहरीन, मलेशिया, टांझानिया आणि वानुआतु हे संघ चॅलेंज लीगचा भाग असणार आहेत. या संघांना प्रत्येकी ६ गटांमध्ये ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक संघाला तीन राऊंड रॉबिन स्पर्धा खेळाव्या लागतील. प्रत्येक पूलमधील अव्वल दोन संघ क्वालिफायर खेळतील.

लीग-2 चे गणित काय?

लीग-2 मध्ये एकूण ८ संघ ठेवण्यात आले आहेत. अव्वल ४ संघ विश्वचषक पात्रता सामने खेळतील. याशिवाय उर्वरित ४ संघ चॅलेंज लीगमधील अव्वल दोन संघांसोबत प्लेऑफ खेळतील. यानंतर, ६ संघांमध्ये क्वालिफायर प्लेऑफ खेळला जाईल, त्यापैकी अव्वल ४ संघ विश्वचषक पात्रता सामने खेळण्यासाठी मैदानात उतरतील.

पात्रता फेरीत किती संघ सहभागी होतील?

पात्रता फेरीत एकूण १० संघांमध्ये लढत होईल, ज्यामध्ये क्रमवारीच्या आधारे ११व्या आणि १२व्या क्रमांकावर असलेल्या संघांचाही समावेश असेल. लीग-2 मधील चार संघ पात्रता फेरीचा भाग असतील, तर तेवढेच संघ चॅलेंज लीगचा भाग असतील. यानंतर या पात्रता फेरीतून एकूण ४ संघांना विश्वचषक खेळण्याचे तिकिटे मिळेल.

IPL_Entry_Point