मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेला दुहेरी धक्के, हे दोन मचविनर गोलंदाज वर्ल्डकपमधून बाहेर

World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेला दुहेरी धक्के, हे दोन मचविनर गोलंदाज वर्ल्डकपमधून बाहेर

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 21, 2023 01:46 PM IST

anrich nortje ruled out from world cup : एकदिवसीय विश्वचषक सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एनरिक नॉर्खियानंतर दुसरा धक्का सिसांदा मगालाच्या रूपाने बसला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो विश्वचषकात सहभागी होऊ शकणार नाही.

odi world cup 2023
odi world cup 2023

anrich nortje sisanda magala ruled out of world cup : एकदिवसीय विश्वचषक सुरू होण्यापूर्वी दुखापतग्रस्त खेळाडूंचा या मेगा स्पर्धेतून बाहेर होण्याचा ट्रेंड कायम आहे. विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दुहेरी धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियानंतर आता गुडघ्याच्या दुखापतीमुळे सिंसादा मगालादेखील विश्वचषक संघातून बाहेर बाहेर पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना एनरिक नॉर्खियाला पाठीचा त्रास झाला. या सामन्यात तो ५ षटके टाकून ड्रेसिंग रूममध्ये परतला. विश्वचषकापूर्वी तो तंदुरुस्त होईल, असा विश्वास आफ्रिकन संघाला होता पण पाठीच्या समस्येमुळे तो आता बाहेर आहे. रेव्हस्पोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, गुडघ्याच्या दुखापतीमुळे सिसांदा मगालादेखील वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.

सिसांदा मगालाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी ८ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि यामध्ये त्याने १४ विकेट्स घेतल्या आहेत. आता या दोन खेळाडूंच्या बदली खेळाडूंची नावे जाहीर करण्यासाठी आफ्रिकन संघाकडे २८ सप्टेंबरपर्यंत वेळ आहे.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना ७ ऑक्टोबरला 

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना ७ ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. याआधी संघाला २ सराव सामने खेळण्याची देखील संधी मिळेल. आफ्रिकेचा पहिला सराव सामना २९ ऑक्टोबरला अफगाणिस्तान संघासोबत आणि दुसरा २ ऑक्टोबरला न्यूझीलंड संघासोबत होणार आहे.

वर्ल्डकपसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, मार्को यानसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.

WhatsApp channel
Cricket News मधील सर्व ताज्या घडामोडी Live Score सह Marathi News आणि प्रत्येक सामन्यागणिक बदलणारा पाहा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर