न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा तुफानी फलंदाज कुसल परेरा याने दमदार शतक झळकावून खळबळ उडवून दिली. परेराने ४६ चेंडूत १०२ धावांची खेळी केली. या खेळीत परेराने १३ चौकार आणि ४ षटकारही मारले.
परेराने ४४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. कुशल परेराचे हे टी-२० फॉरमॅटमधील पहिले शतक होते. कुसल परेराच्या दमदार फलंदाजीमुळे श्रीलंकेच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून २०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही तगडी झुंज देत २० षटकात ७ बाद २११ धावांपर्यंत मजल मारली.
न्यूझीलंडचा ७ धावांनी पराभव झाला, मात्र त्यांनी तीन टी-20 सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.
तत्पर्वी, न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात श्रीलंकेच्या संघाची सुरुवात फारशी खास नव्हती. अवघ्या २४ धावांवर संघाची पहिली विकेट पडली. मात्र, यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या परेराने पहिल्याच चेंडूपासून आपली जादू दाखवण्यास सुरुवात केली. परेराला सुरुवातीला कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही, मात्र कर्णधार चारिथ असलंकाने त्याला काही षटके साथ दिली.
श्रीलंकेविरुद्धच्या या झंझावाती शतकानंतर कुसल परेराच्या नावावर एक मोठा विक्रमही नोंदवला गेला. कुसल परेरा हा श्रीलंकेसाठी T20 फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशानला मागे टाकले आहे, ज्याने २०११ मध्ये ५५ चेंडूत शतक झळकावले होते. या कुसल परेराने १४ वर्षे जुना विक्रम मोडला.
कुसल परेराशिवाय चारिथ असनाल्कानेही संघासाठी दमदार खेळी केली. असलंकाने अवघ्या २४ चेंडूत ४६ धावा केल्या. अस्लंकाच्या या खेळीची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याने ५ षटकार आणि फक्त २ चौकार लगावला. मात्र, या दोन फलंदाजांनंतर इतर कोणत्याही खेळाडूला आपली प्रतिभा दाखवता आली नाही.
श्रीलंकेच्या २१९ पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. त्यांच्या सलामीवीरांनी ७ षटकात ८१ धावा ठोकल्या. टीम रॉबिन्सन याने २१ चेंडूत ३७ तर रचिन रवींद्र (Rachin Ravindra) ३९ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. त्याने ४ षटकार आणि ५ चौकार मारले.
हे दोघे बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या डावाला गळती लागली. शेवटी डॅरिल मिचेलने (Daryl Mitchell) १७ चेंडूत ३५ धावा ठोकत न्यूझीलंडला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. मिचेलने १ चौकार आणि ४ षटकार लगावले.
संबंधित बातम्या