मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Lockie Ferguson : टी-20 मध्ये ४ षटकं निर्धाव टाकणारा लॉकी फर्ग्युसन दुसरा गोलंदाज, पहिला कोण? जाणून घ्या

Lockie Ferguson : टी-20 मध्ये ४ षटकं निर्धाव टाकणारा लॉकी फर्ग्युसन दुसरा गोलंदाज, पहिला कोण? जाणून घ्या

Jun 18, 2024 11:59 AM IST

Lockie Ferguson Maiden Overs Record : न्यूझीलंडला टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या सुपर-८ मध्ये स्थान मिळवता आले नाही. पण त्यांनी पापुआ न्यू गिनीविरुद्ध गट टप्प्यातील शेवटचा सामना जिंकला. या सामन्यात लॉकी फर्ग्युसनने शानदार गोलंदाजी केली.

Lockie Ferguson : टी-20 मध्ये ४ षटकं निर्धाव टाकणारा लॉकी फर्ग्युसन दुसरा गोलंदाज, पहिला कोण? जाणून घ्या
Lockie Ferguson : टी-20 मध्ये ४ षटकं निर्धाव टाकणारा लॉकी फर्ग्युसन दुसरा गोलंदाज, पहिला कोण? जाणून घ्या (X)

टी-20 विश्वचषक २०२४ चा ३९ वा सामना न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात खेळला गेला. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेला सामना न्यूझीलंडने ७ विकेटने जिंकला.

पण दोन्ही संघांना सुपर-८ मध्ये स्थान मिळवण्यात यश आलेले नाही. दोन्ही संघ साखळी फेरीतूनच बाहेर पडले.

ट्रेंडिंग न्यूज

पण या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने एक अविश्वसनीय रेकॉर्ड केला. यानंतर लॉकी फर्ग्युसनच्या शानदार गोलंदाजीची चर्चा होत आहे. या सामन्यात लॉकी फर्ग्युसनने आपल्या स्पेलमध्ये ३ विकेट घेतल्या.

लॉकी फर्ग्युसन सर्व षटकं निर्धाव टाकली

लॉकी फर्ग्युसन हा T20 विश्वचषकाच्या इतिहासात ४ षटकांच्या स्पेलमध्ये सर्व मेडन षटके टाकणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. याशिवाय लॉकी फर्ग्युसन हा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात ४ मेडन ओव्हर टाकणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

यापूर्वी, पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे फक्त एकदाच घडले होते, फर्ग्युसनच्या आधी कॅनडाच्या साद बिन जफरने २०२१ मध्ये पनामाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याची संपूर्ण ४ षटकं निर्धाव टाकली होती.

३३ वर्षीय फर्ग्युसने कोट्यातील चारही षटके मेडन टाकली. त्याने ३ बळी घेतले. अशी कामगिरी करणारा तो कसोटी खेळणारा राष्ट्रीय संघातील पहिला गोलंदाज ठरला आहे. फर्ग्युसनने या सामन्यात चाड सोपर (१ धाव), चार्ल्स अमिनी (१७ धावा) आणि कर्णधार असद वाला (६ धावा) यांना बाद केले.

WhatsApp channel