मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  NZ vs PAK T20 : डॅरिल मिशेलने पाकिस्तानी गोलंदाजांना धुतलं, न्यूझीलंडचा धावांचा डोंगर, पाहा

NZ vs PAK T20 : डॅरिल मिशेलने पाकिस्तानी गोलंदाजांना धुतलं, न्यूझीलंडचा धावांचा डोंगर, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 12, 2024 01:35 PM IST

NZ vs PAK T20 Scorecard : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. कर्णधार म्हणून शाहीन आफ्रिदीची ही पहिलीच मालिका आहे. यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने ही दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मालिका आहे.

NZ vs PAK T20 Scorecard
NZ vs PAK T20 Scorecard (AFP)

Pakistan Vs New Zealand 1st T20 Scorecard : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (१२ जानेवारी) ऑकलंडमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकात ८ बाद २२६ धावांचा डोंगर उभारला आहे. आता पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी २२७ धावा करायच्या आहेत.

न्यूझीलंडकडून या सामन्यात डॅरिल मिशेलने सर्वाधिक ६१ धावा केल्या. त्याने अवघ्या २७ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकार ठोकले. तर कर्णधार केन विल्यमसनने ४२ चेंडूत ५७ धावा केल्या. फिन एलन ३५ तर मार्क चॅपमनने झटपट २६ धावा केल्या. एलनने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. तर चॅपमनने २ चौकार आणि २ षटकार मारले.

या फलंदाजांशिवाय न्यूझीलंडचे इतर फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. पाकिस्तानकडून कर्णधार शाहीन आफ्रिदीने ४ षटकात ४६ धावा देत ३ विकेट घेतले तर अब्बास आफ्रिदीने ३२ धावांत ३ विकेट घेतले.

कॉनवे पहिल्याच षटकात बाद झाला

तत्पूर्वी, न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात संघाला पहिला धक्का बसला. शाहीनच्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर डेव्हॉन कॉनवे बाद झाला. त्याला शाहीनने आमिर जमालकरवी झेलबाद केले. कॉनवे खाते उघडू शकला नाही. यानंतर तिसऱ्या षटकात शाहीन पुन्हा गोलंदाजीला आला, पण यावेळी या षटकात फिन एलनने २४ धावा फटकावल्या. या षटकात त्याने २ षटकार आणि ३ चौकार मारले.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान: मोहम्मद रिझवान, सॅम अयुब, बाबर आझम, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आझम खान (विकेटकीपर), आमेर जमाल, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी (कर्णधार), अब्बास आफ्रिदी, हरिस रौफ.

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, टिम साउदी, इश सोधी, बेन सियर्स.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi