मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Nz Vs Pak T20 : पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव, ऑकलंडमध्ये पडला ४०० हून अधिक धावांचा पाऊस

Nz Vs Pak T20 : पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव, ऑकलंडमध्ये पडला ४०० हून अधिक धावांचा पाऊस

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 12, 2024 03:58 PM IST

Nz Vs Pak 1st T20 Highlights : पाकिस्तानकडून माजी कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली, मात्र तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.

Nz Vs Pak 1st T20
Nz Vs Pak 1st T20 (AFP)

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील ५ टी-20 सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (१२ जानेवारी) ऑकलंड येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा ४६ धावांनी धुव्वा उडवला.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद २२६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान १८० धावांवर सर्वबाद झाला.

 पाकिस्तानकडून माजी कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली, मात्र तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. 

किवी संघाकडून टीम साऊदीने २५ धावांत सर्वाधिक ४ विकेट घेतल्या तर अॅडम मिलने आणि बेन सीर्स यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. 

२२६ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. पण खालच्या फळीतील फलंदाज फ्लॉप ठरले. 

नवा सलामीवीर सॅम अयुबने पाकिस्तानला वादळी सुरुवात करून दिली होती. त्याने केवळ ८ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २७ धावा ठोकल्या. दुसरा सलामीवीर मोहम्मद रिझवानने १४ चेंडूत २५ धावा केल्या.  

पण यानंतर पाकिस्तानने सातत्याने विकेट गमावल्या. एका टोकाला माजी कर्णधार बाबर आझमने ३५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावांची खेळी खेळली.

न्यूझीलंडचा डाव

न्यूझीलंडकडून या सामन्यात डॅरिल मिशेलने सर्वाधिक ६१ धावा केल्या. त्याने अवघ्या २७ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकार ठोकले. तर कर्णधार केन विल्यमसनने ४२ चेंडूत ५७ धावा केल्या. फिन एलन ३५ तर मार्क चॅपमनने झटपट २६ धावा केल्या. एलनने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. तर चॅपमनने २ चौकार आणि २ षटकार मारले.

या फलंदाजांशिवाय न्यूझीलंडचे इतर फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. पाकिस्तानकडून कर्णधार शाहीन आफ्रिदीने ४ षटकात ४६ धावा देत ३ विकेट घेतले तर अब्बास आफ्रिदीने ३२ धावांत ३ विकेट घेतले.

 

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi