NZ Vs AFG Highlights : राशीद खान -फजल हक फारुकीसमोर न्यूझीलंड १५ षटकात गारद, अफगाणिस्तानचा मोठा विजय
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  NZ Vs AFG Highlights : राशीद खान -फजल हक फारुकीसमोर न्यूझीलंड १५ षटकात गारद, अफगाणिस्तानचा मोठा विजय

NZ Vs AFG Highlights : राशीद खान -फजल हक फारुकीसमोर न्यूझीलंड १५ षटकात गारद, अफगाणिस्तानचा मोठा विजय

Jun 08, 2024 11:19 AM IST

NZ Vs AFG T20 World Cup Highlights : टी-20 क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तानचा न्यूझीलंडवर पहिला विजय आहे. अफगाणिस्तानने ५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रथमच न्यूझीलंडचा पराभव केला आहे. दुसरीकडे, टी-20 विश्वचषक सामन्यांमध्ये धावांच्या बाबतीत न्यूझीलंडचा हा सर्वात मोठा पराभव आहे.

NZ Vs AFG T20 World Cup Highlights
NZ Vs AFG T20 World Cup Highlights (PTI)

NZ Vs AFG T20 World Cup Highlights : टी-20 विश्वचषक २०२४ चा १४ वा सामना (८ जून) अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा ८४ धावांनी धुव्वा उडवला.

टी-20 क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तानचा न्यूझीलंडवर पहिला विजय आहे. अफगाणिस्तानने ५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रथमच न्यूझीलंडचा पराभव केला आहे. दुसरीकडे, टी-20 विश्वचषक सामन्यांमध्ये धावांच्या बाबतीत न्यूझीलंडचा हा सर्वात मोठा पराभव आहे.

या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अफगाणिस्तानने प्रथम खेळताना २० षटकांत ६ बाद १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ अवघ्या ७५ धावांत गारद झाला.

या सामन्यात अफगाणिस्तान संघाच्या विजयाचा नायक रहमानउल्ला गुरबाज होता, त्याने ५६ चेंडूत ८० धावांची खेळी केली. त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब देण्यात आला. इब्राहिम झद्राननेही ४४ धावा केल्या.

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी तर कमालच केली. फजलहक फारुकी आणि कर्णधार राशिद खान यांनी जबदरस्त गोलंदाजी केली. दोघांनी ४-४ विकेट घेतल्या. T20 वर्ल्डकपमधील सलग दोन सामन्यात ४ विकेट घेणारा फझलहक फारुकी हा अफगाणिस्तानचा पहिला गोलंदाज ठरला आहे.

तत्पूर्वी, १६० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात अतिशय खराब झाली. न्यूझीलंडच्या डावातील पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फिन ऍलन क्लीन बोल्ड झाला. त्याला फजलहक फारुकीने एका शानदार इनस्विंगवर क्लीन बोल्ड केले.

यानंतर न्यूझीलंडचा संघ सावरू शकला नाही. 'तू चल में आया'च्या धर्तीवर किवी संघाचे फलंदाज सतत बाद होत राहिले. फारुकीने सुरुवातीच्या फलंदाजांची शिकार केली तर कर्णधार राशिद खान आणि मोहम्मद नबी यांनी मधल्या फळी आणि लोअर मिडल ऑर्डरचा कणा मोडला. न्यूझीलंडचा संघ पूर्ण षटकेही खेळू शकला नाही आणि अवघ्या १५.२ षटकांत ७५ धावांत सर्वबाद झाला.

अफगाणिस्तानसाठी फारुकीने ३.२-०-१७-४ असा धोकादायक स्पेल टाकला. त्याचवेळी कर्णधार राशिद खाननेही शानदार गोलंदाजी करत ४ षटकात १७ धावा देत विकेट्स घेतल्या. अनुभवी मोहम्मद नबीनेही ४ षटकात केवळ १६ धावा देत २ बळी घेतले.

अफगाणिस्तानच्या डाव

या सामन्यात रहमानउल्ला गुरबाज (८० धावा, ५६ चेंडू, ५ चौकार आणि ५ षटकार) आणि इब्राहिम झद्रान (४४ धावा, ४१ चेंडू, ३ चौकार, २ षटकार) यांनी अफगाणिस्तानसाठी पहिल्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली. झादरन बाद झाल्यानंतर अजमतुल्ला उमरझाई आला, त्याने १३ चेंडूत २२ धावा केल्या. मात्र त्यानंतर अफगाणिस्तान संघाच्या विकेट्स सातत्याने पडत राहिल्या.

अशा प्रकारे २० षटकात ६ बाद १५९ धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री यांनी २-२ विकेट घेतल्या. तर लॉकी फर्ग्युसनला १ विकेट मिळाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या