BBL Video : सर्वांना वाटलं षटकार गेला… स्टॉइनीसच्या विकेटवर जोकोविचला विश्वासच बसेना! रिअ‍ॅक्शन व्हायरल
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  BBL Video : सर्वांना वाटलं षटकार गेला… स्टॉइनीसच्या विकेटवर जोकोविचला विश्वासच बसेना! रिअ‍ॅक्शन व्हायरल

BBL Video : सर्वांना वाटलं षटकार गेला… स्टॉइनीसच्या विकेटवर जोकोविचला विश्वासच बसेना! रिअ‍ॅक्शन व्हायरल

Jan 12, 2025 09:05 PM IST

Novak Djokovic BBL Match : बिग बॅश लीगचा सामना पाहण्यासाठी नोव्हाक जोकोविच मेलबर्नच्या डॉकलँण्ड स्टेडियमवर पोहोचला होता.

BBL Video : सर्वांना वाटलं षटकार गेला… स्टॉइनीसच्या विकेटवर जोकोविचला विश्वासच बसेना! रिअ‍ॅक्शन व्हायरल
BBL Video : सर्वांना वाटलं षटकार गेला… स्टॉइनीसच्या विकेटवर जोकोविचला विश्वासच बसेना! रिअ‍ॅक्शन व्हायरल

Melbourne Renegades vs Melbourne Stars Highlights : ऑस्ट्रेलियात सध्या बिग बॅश लीगचा थरार सुरू आहे. रविवारी (१२ जानेवारी) या स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी दिग्गज टेनिस स्टार नोव्हाक जोकोविच हादेखील पोहोचला होता.

वास्तविक, जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनसाठी मेलबर्नमध्ये आहे. मेलबर्नच्या डॉकलँण्ड्स स्टेडियमवर मेलबर्न स्टार्स आणि मेलबर्न रेनेगेड्स आमनेसामने होते. मेलबर्न स्टार्सकडून ग्लेन मॅक्सवेलने ५२ चेंडूत ९० धावांची तुफानी खेळी केली. मॅक्सवेलने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके मारून चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. त्याने आपल्या खेळीत १० षटकार मारले.

यानंतर मेलबर्न स्टार्सच्या डावात कर्णधार मार्कस स्टॉइनिस याने १० चेंडूत १८ धावा केल्या. पण यानंतर षटकार मारण्याच्या प्रयत्नात केन रिचर्डसनने त्याचा अप्रतिम झेल घेतला.

जोकोविचला विश्वास बसला नाही

हा झेल पाहून जोकोविच यालाही आश्चर्य वाटले. कारण चेंडू बॅटला लागल्यानंतर तो प्रेक्षकांमध्ये जाईल, असे त्याला वाटले होते. पण चेंडू षटकारासाठी न जाता लॉंग ऑनवर उभ्या असलेल्या केन रिचर्डसनच्या हातात गेला. यानंतर जोकोविचला विश्वास बसत नव्हता, असे त्याच्या हावभावांवरून वाटत होते.

दरम्यान, हा झेल झाल्यानंतर चेंडू स्टेडियमच्या छताला लागला आहे, असा दावा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने करण्यात आला. पण व्हिडीओमध्ये तसेच, रिप्लेमध्ये याचा कोणताही पुरावा आढळला नाही. त्यामुळे स्टोइनीसला तंबूत परतावे लागले. या हंगामात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. जेव्हा चेंडू छतावर आदळतो तेव्हा पंच त्याला डेड बॉल घोषित करतात.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मेलबर्न स्टार्स संघाने १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मेलबर्न रेनेगेड्सचा डाव अवघ्या १२३ धावांत गारद झाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या