IPL 2024: आयपीएल २०२४ पूर्वी गुजरातला मोठा धक्का? स्टार खेळाडूवर १२ महिन्यांची बंदी, वाचा कारण-noor ahmad banned from ilt20 for 12 months due to breach of contract ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024: आयपीएल २०२४ पूर्वी गुजरातला मोठा धक्का? स्टार खेळाडूवर १२ महिन्यांची बंदी, वाचा कारण

IPL 2024: आयपीएल २०२४ पूर्वी गुजरातला मोठा धक्का? स्टार खेळाडूवर १२ महिन्यांची बंदी, वाचा कारण

Feb 21, 2024 05:48 PM IST

Indian Premier League: येत्या २२ मार्च २०२४ पासून आयपीएलच्या १७व्या हंगामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Gujarat Titans
Gujarat Titans

Noor Ahmad Banned From ILT20 for 12 Months: आयपीएलबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २२ मार्च २०२४ पासून आयपीएलच्या १७व्या हंगामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी, उपगतविजेते गुजरात टायटन्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू नूर अहमदवर १२ महिन्यांची बंदी घालण्यात आली.

नूर अहमद आंतरराष्ट्रीय टी-२० लीगमध्ये शारजाह वॉरियर्सकडून खेळत असताना त्याने फ्रँचायझीसोबत केलेल्या कराराच्या नियमांचे उल्लंघन केले. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० लीगमध्ये खेळण्याऐवजी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या टी-२० लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्याच्यावर १२ महिन्यासाठी बंदी घालण्यात आली. मात्र, तो आयपीएलमध्ये खेळणार की नाही? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

नूर अहमदवरही सुरुवातीला 20 महिन्यांची बंदी घालण्यात आली. पण तो अल्पवयीन असल्याने त्याची शिक्षा १२ महिन्यांपर्यंत कमी करण्यात आली. या बंदीमुळे खेळाडूला मोठा धक्का बसला. आंतरराष्ट्रीय टी-२० लीग द्वारे नूर अहमदविरोधात नेमकी कोणती कारवाई होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Virat Kohli: विराटला पुत्ररत्न झाल्याची बातमी समजताच पाकिस्तानातही सेलिब्रेशन, चाहते काय म्हणाले पाहाच!

देशात यंदा लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्याचवेळी आयपीएलचा थरारही होणार आहे. येत्या २२ मार्चपासून आयपीएलच्या १७व्या हंगामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पण हे वेळापत्रक फक्त १० दिवसांचे असेल, असेही अरुण धुमळ यांनी सांगितले.

विभाग