IPL 2024: लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल २०२४ भारताबाहेर? बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले…
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024: लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल २०२४ भारताबाहेर? बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले…

IPL 2024: लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल २०२४ भारताबाहेर? बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले…

Mar 16, 2024 11:00 PM IST

BCCI Moving IPL 2024s Second Leg Outside India: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर बीसीसीआय आयपीएल २०२४ मधील उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

BCCI Secretary Jay Shah
BCCI Secretary Jay Shah (PTI)

IPL 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलच्या सतराव्या हंगामामधील पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार २२ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान पहिला टप्पा पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण २१ सामने खेळले जातील. याच पार्श्वभूमीवर आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बीसीसीआय संयुक्त अरब अमिरातीचा विचार करत असल्याची चर्चांना उधाण आले. अशा चर्चांवर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पूर्णविराम लावला. आयपीएल २०२४ चा संपूर्ण हंगाम भारतात खेळवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांचा संघर्ष आणिआयपीएलच्या १७ व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यांबद्दल अनिश्चितता असताना, बीसीसीआय आयपीएल स्पर्धेच्या पुढील सहामाहीच्या आयोजनासाठी पर्याय म्हणून संयुक्त अरब अमिरातीचा विचार करीत असल्याचे संकेत एका अहवालात देण्यात आले. दरम्यान, बोर्डाचे सचिव जय शाह यांनी शनिवारी या अफवांचे खंडन करत आयपीएल २०२४ चा संपूर्ण हंगाम भारतात खेळवला जाईल, अशी पुष्टी केली. सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर काही तासांनी क्रिकबझशी बोलताना शहा यांनी आयपीएल २०२४ चा उत्तरार्ध परदेशात आयोजित करण्याची अटकळ फेटाळून लावली.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यांत होणार असल्याचे जाहीर केले. मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर बीसीसीआय आयपीएल २०२४ च्या उर्वरित सामन्यांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

सध्या भारतीय क्रिकेट बोर्डाने २२ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्याची सुरुवात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात बंगळुरू येथे होणार आहे. तर, लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात या हंगामातील २१ वा सामना खेळला जाणार आहे. आयपीएल २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकात चार डबल हेडरचा समावेश आहे,

Whats_app_banner