चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत पाकिस्तान आणि दुबई येथे होणार आहे. भारतीय संघ २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध सामना खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
या स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. यावरू नवा वाद निर्माण झाला आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक पाकिस्तानचे नाव प्रत्येक संघाच्या जर्सीवर छापले जाणार आहे, परंतु बीसीसीआयने त्यास नकार दिला आहे. आता या वादात आयसीसीचे वक्तव्य समोर आले आहे.
वास्तविक, पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आयोजन करत आहे. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव, ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे.
अशा स्थितीत भारताने आपल्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापण्यास नकार दिला आहे. यावर आता आससीसी बासीसीआयच्या बाजून असल्याचे समोर आले आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानेच ही माहिती दिली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) बीसीसीआयचा निर्णय मान्य करेल, असे संकेत बीसीसीआयच्या सूत्रांनी दिले आहेत. बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह सध्या आयसीसीच्या अध्यक्षपदी आहेत.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एका वृत्तपत्राला सांगितले की, "आयसीसीने यापूर्वीच पाकिस्तानच्या अनेक गोष्टी मान्य केल्या आहेत. त्यामुळे हे किरकोळ मुद्दे आहेत.
आयसीसीच्या नियमांनुसार, संघांना त्यांच्या जर्सीवर यजमान संघाचे नाव लिहावे लागते.
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.
संबंधित बातम्या