Nitish Kumar Reddy : २१ वर्षांच्या नितीश रेड्डीचा मेलबर्नमध्ये जलवा, कसोटी करिअरचं पहिलं शतक झळकावलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Nitish Kumar Reddy : २१ वर्षांच्या नितीश रेड्डीचा मेलबर्नमध्ये जलवा, कसोटी करिअरचं पहिलं शतक झळकावलं

Nitish Kumar Reddy : २१ वर्षांच्या नितीश रेड्डीचा मेलबर्नमध्ये जलवा, कसोटी करिअरचं पहिलं शतक झळकावलं

Dec 28, 2024 12:01 PM IST

Nitish Kumar Reddy Century : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याचा आज (२८ डिसेंबर) तिसरा दिवस असून टीम इंडिया फलंदाजी करत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या.

Nitish Kumar Reddy : २१ वर्षांच्या नितीश रेड्डीचा मेलबर्नमध्ये जलवा, कसोटी करिअरचं पहिलं शतक झळकावलं
Nitish Kumar Reddy : २१ वर्षांच्या नितीश रेड्डीचा मेलबर्नमध्ये जलवा, कसोटी करिअरचं पहिलं शतक झळकावलं

Nitish Kumar Reddy Maiden Test Century vs Australia : टीम इंडियाचा युवा ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी याने कसोटी करिअरचे पहिले शतक झळकावले आहे. 

२१ वर्षांच्या नितीश कुमार रेड्डी याने जे करून दाखवले आहे, ते भल्याभल्यांना जमले नाही. ऑस्ट्रेलियन भूमीवर शतक ठोकणे हे खेळाडूंचे स्वप्न असते आणि नितीशने अवघ्या २१व्या वर्षी हे स्वप्न साकार केले आहे.

 नितीश कुमार रेड्डी याने मेलबर्न येथे सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन आपले पहिले कसोटी शतक झळकावले. त्याने १७१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. रेड्डीने स्कॉट बोलँडवर चौकार मारून शतक पूर्ण केले.

या संपूर्ण मालिकेत नितीशने आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. या शतकापूर्वी त्याने तीनदा ४० हून अधिक धावा केल्या होत्या. पण त्याला आपल्या शानदार सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. मात्र, आज तसे झाले नाही.

या शतकादरम्यान रेड्डीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. ८व्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो ऑस्ट्रेलियात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडूही ठरला आहे. रेड्डीने शतक झळकावताना १० चौकार आणि १ षटकार मारला. बातमी लिहिपर्यंत रेड्डी अजूनही नाबाद असून १०४ धावांवर खेळत आहे.

नितीशकुमार रेड्डी भारतासाठी संकटमोचक ठरला

वास्तविक, नितीश कुमार रेड्डी जेव्हा फलंदाजीला उतरला तेव्हा भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. टीम इंडियाच्या ६ विकेट १९१ रन्सवर पडल्या होत्या.

फॉलोऑनचा धोका भारतावर होता. पंत बाद झाल्यानंतर काही वेळातच अनुभवी फलंदाज रवींद्र जडेजाही बाद झाला. यानंतर वॉशिंग्टन सुंदरसह नितीश रेड्डी यांनी भारताला फॉलोऑनपासून वाचवले आणि आघाडी हळूहळू कमी केली.

आठव्या विकेटसाठी सुंदर आणि नितीश यांनी मिळून भारतासाठी १२७ धावांची भागीदारी केली. या भागीदारीने भारताला सामन्यात परत आणले आहे. एकेकाळी टीम इंडियाला फॉलोऑन खेळावा लागेल असे वाटत होते. पण आता भारत ज्या स्थितीत उभा आहे. तिथून सामना जिंकणे अशक्य नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या